Dhule Haldi Ceremony attack Three Dies in Ruckus over Family Dispute Crime News; लग्नपत्रिकेवरुन वाद उफाळला, भावकीच्या भांडणातून हळदीतच तिघांना संपवलं, व्हॉट्सअप स्टेटसमुळे वेगळाच संशय
Dhule Haldi Ceremony attack Three Dies in Ruckus over Family Dispute Crime News; लग्नपत्रिकेवरुन वाद उफाळला, भावकीच्या भांडणातून हळदीतच तिघांना संपवलं, व्हॉट्सअप स्टेटसमुळे वेगळाच संशय
Dhule Haldi Ceremony Attack : हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप स्टेटसवर ठार मारण्याची धमकी दिली होती, असा दावा अशोक गिरी यांनी केला
धुळ्यात हळदीत हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, धुळे : जिल्ह्यातील पिंपळनेर येथील नीलकंठनगर परिसरात जुन्या वादातून आणि लग्नपत्रिकेतील नावाच्या वादातून गोसावी समाजातील भाऊबंधकीमधील दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या संघर्षात धारदार शस्त्राने केलेल्या हल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे धुळे जिल्हा हादरला आहे. हल्ल्यातील मृतांमध्ये देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५), सुरेश मोजगीर गोसावी (५५) आणि साहिल सुरेश गोसावी (वय २२) यांचा समावेश आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
काय झालं नेमकं?
पिंपळनेर शहरातील नीलकंठ- नगरमध्ये राहणारे विजय गोसावी यांच्या मुलीच्या लग्नाचा साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम गुरुवारी दुपारच्या सुमारास सुरू होता. सर्व नातेवाईक एकत्र जमले होते. मात्र, दुपारी अचानक दोन गट आमनेसामने आले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात हल्लेखोरांनी कुऱ्हाड आणि चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी समोरच्या व्यक्तींवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. मंडपात रक्ताचा सडा पडला. HiLITE Group : मालक असावा तर असा! कंपनीकडून 47 कर्मचाऱ्यांना 20 कोटींच्या आलिशान गाड्या भेट; ऑडी, रेंज रोव्हर ते स्कोडा कारची खैरात हल्ल्यात गंभीर जखमी झालेले देवेंद्र पवार, सुरेश गोसावी आणि साहिल गोसावी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान या तिघांचाही मृत्यू झाला. पंकज अशोकगीर गोसावी, सुरेश सुपडूगीर गोसावी आणि सागर गोसावी गंभीर जखमी असून, यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
Raj Thackeray | न पाहिलेली मुंबई पाहिली, शेतकरी पत्नींनी साधला राज ठाकरेंशी संवाद
तिघांना अटक
या घटनेनंतर पिंपळनेर पोलिसांनी तीन आरोपींना ओटाबारी येथे अटक केली. कांतीलाल गोसावी, जयंत गोसावी आणि ब्रिझा कारचा चालक (सर्व रा. गुजरात) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणी कानागिरी गोसावी, यशवंत गोसावी, अनिलगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime : कात्रजला जायचंय, रिक्षा इथे का नेता? वादावादीत महिलेला संपवलं, पोलिसांनी 97 सीसीटीव्ही फूटेज तपासले, अखेर गूढ उकललंच हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप स्टेटसवर ठार मारण्याची धमकी दिली होती, असा दावा अशोक गिरी यांनी केला आहे. ही धमकी गांभीर्याने घेतली असती तर कदाचित आज हा भीषण रक्तपात झाला नसता, अशी भावना व्यक्त होत आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा