Dhule Demanded 2 lakh for Caste Validity Certificate LCB Arrested a Teacher; ‘अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध, पण..’; जात वैधता प्रमाणपत्रासाठी 2 लाखांची मागणी, LCBने सापळा रचला अन्…
Dhule Demanded 2 lakh for Caste Validity Certificate LCB Arrested a Teacher; ‘अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध, पण..’; जात वैधता प्रमाणपत्रासाठी 2 लाखांची मागणी, LCBने सापळा रचला अन्…
Dhule Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळे जिल्ह्यात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या घटनेनं धुळ्यात खळबळ उडाली आहे.
धुळे एलसीबीकडून शिक्षकाला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अजय गर्दे, धुळे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रादाराकडून 3 लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या शिक्षकाला एसीबीने अटक केली आहे. नितीन लिलाधर ठाकूर (वय 46, रा.देवपूर, धुळे) असं या शिक्षकाचं नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील तक्रारदार यांना स्वतःचे व बहिणीचे हिंदू ठाकूर या जातीचे जात वैधता प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे येथे अर्ज केला होता. परंतु, सुमारे तीन वर्षे होवूनही त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नव्हते. त्यामुळे त्यांनी सदर कार्यालयात जावून तेथील लिपीकाकडे चौकशी केली. लिपीकाने त्यांना सदर कार्यालयातील जात पडताळणी प्रमाणपत्राची कामे न्यू सिटी हायस्कूल येथील शिक्षक नितीन ठाकूर हे करतात, त्यामुळे त्यांना भेटा, असं सांगीतलं.
तक्रारदार यांनी शिक्षक नितीन ठाकूर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रादाराला आपले समितीच्या अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचं सांगून आपल्यामार्फत पैसे घेवून ते जात पडताळणीचे काम करुन देतात, असं सांगितलं. तसेच अधिकाऱ्यांच्या नावाने 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने थेट धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात (एसीबी) तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करुन शिक्षक नितीन ठाकूर याला अटक करत त्याच्याविरोधात धुळे पोलिसांत गुन्हा दाखल केला.
अनेकवेळा पैसे देण्याचे ठरले पण आरोपी नितीन ठाकुर हा पैसे घेण्यास टाळाटाळ करत होता. अखेर चार महिन्यानंतर अर्थात काल गुरुवारी रोजी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने काल गुरुवारी दुपारी सापळा रचला. लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर नितीन ठाकूर याला अटक केली. त्याच्याविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन ठाकूर याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा