Gondia Three women drown in Bagh River while performing Pinddan Vidhi; नातेवाईकाचे पिंडदान करताना काळाचा पुन्हा घाला, दुःखातून सावरणाऱ्या कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू
Gondia Three women drown in Bagh River while performing Pinddan Vidhi; नातेवाईकाचे पिंडदान करताना काळाचा पुन्हा घाला, दुःखातून सावरणाऱ्या कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू
Women Drown in river : संपूर्ण पिंडदान पूजा संपल्यानंतर कुटुंबीय बाघ नदीच्या काठावर आंघोळ करण्यासाठी गेले. सर्वात आधी समिता टेंभरे नदीकाठच्या दगडावरुन घसरली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : बाघ नदीच्या करोणी घाटावर पिंडदान करण्यासाठी आलेल्या नागपूर शहराजवळील हिंगणा येथील तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी गोंदिया तालुक्यातील रजेगावजवळ घडली. समिता शत्रुघ्न टेंभरे, वय 32 वर्ष, मीनाक्षी बघेले, वय 36 वर्ष, व मीराबाई इसुलाल तुरकर, वय 55 वर्ष, सर्व राहणार राजीवनगर (हिंगणा) अशी मृतांची नावे आहेत.
पिंडदान करण्यासाठी या तिन्ही महिला बाघ नदीच्या कोरणी घाटावर आल्या होत्या. पिंडदान करीत असताना समिता यांचा तोल गेल्याने नदीत कोसळल्या. त्यांना वाचविण्यासाठी मीनाक्षी आणि मीराबाईदेखील धावून आल्या. कुणालाही पोहता येत नसल्याने नदीच्या खोल पाण्यात तिघीही क्षणात बुडाल्या. काठावर असलेल्यांना हे दिसून येताच त्यांनी मदतीसाठी धावा केला.
नेमका कसा झाला अपघात?
संपूर्ण पिंडदान पूजा संपल्यानंतर कुटुंबीय बाघ नदीच्या काठावर आंघोळ करण्यासाठी गेले. सर्वात आधी समिता टेंभरे नदीकाठच्या दगडावरुन घसरली. हे पाहून आधी मीनाक्षी बघेले हिने तिला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली, मात्र ती देखील बुडू लागली.
जेव्हा या दोघींना बुडताना पाहून 55 वर्षीय मीराबाई तुरकर यांना राहावले नाही, तेव्हा त्यांनीदेखील तिला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली, मात्र दुर्दैवाने काळाने तिघींवरही घाला घातला. पिंडदान विधी करताना तिघीही बुडाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. Worli Murder : आधी पत्नीचा जीव घेतला, मग स्वतःचं आयुष्य संपवलं, मुलगा खोलीबाहेर धावत आला अन्… वरळीत पहाटे थरार आपत्ती निवारण कक्षाला माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथकांनी घटनास्थळ गाठले. शोध मोहिमेनंतर तिन्ही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. रावणवाडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.
Mumbai – Pune Expressay| खंडाळ्यात सुरक्षा फलकच बनला असता गाडीचालकाच्या मृत्यूचं कारण, पाहा व्हिडीओ
तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
जळगाव शहरात मुस्लिम बांधवांमध्ये बकरी ईदचा उत्साह असताना मेहरूण तलावामध्ये पोहण्यास गेलेल्या तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास घडली. वेळेवर मदत न मिळाल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. महंमद नदीम शेख गनी, वय 24 वर्ष, रा. तांबापुरा, जळगाव, असे मृत तरुणाचे नाव आहे. Sonam Raghuvanshi : बेपत्ता हनिमून जोडपे केसमध्ये कल्पनेपलिकडचा ट्विस्ट, राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पत्नी सोनमला अटक मेकॅनिक काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, शनिवारी बकरी ईदचा सण असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. अशातच नदीम शेख हा त्याच्या काही मित्रांसह मेहरुण तलाव येथे पोहण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. या वेळी मित्रांनी आजूबाजूला असलेल्या नागरिकांना बोलावले; तसेच पालिकेच्या यंत्रणेलादेखील काही नागरिकांनी फोन केला. मात्र, त्या ठिकाणी वेळेवर प्रशासन आले नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा