Headlines

Concern over decrease in rainfall in maharashtra imd weather forecast for a week; पावसाने आठवडाभर झोडपलं, पण आता पुन्हा चिंतेचे ढग; महाराष्ट्रातील पाऊस गायब होणार, हवामान खात्याचा ताजा अंदाज


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: जुलैच्या पहिल्या सात दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील एकूण पाऊस आता सरासरीच्या श्रेणीत आला आहे. या कालावधीत राज्यातील ३६पैकी १८ जिल्ह्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, सात जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त, तर सात जिल्ह्यांमध्ये सरासरी श्रेणीत पाऊस नोंदला गेला. मात्र, आता येत्या आठवड्यांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात दिवसांमध्ये जमा झालेले पाणी सांभाळून वापरणे अत्यावश्यक ठरणार आहे.

कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील जेऊर, महाबळेश्वर, पुणे, सांगली, सातारा या केंद्रांवर सात जुलैच्या सकाळी ८.३० वाजेपर्यंत आत्ताच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला आहे. कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त किंवा तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस नोंदला गेला. विदर्भात गोंदिया येथे अतिरिक्त पाऊस नोंदला गेला. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पावसाची तूट आहे, तर मोजक्या जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीत पडला आहे.

उत्तर कोकणात गुरुवारी, नऊ जुलैला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. ११ जुलैपर्यंत हलक्या सरींची शक्यता असेल. दक्षिण कोकणात नऊ जुलैपासून रायगड जिल्ह्यात हलक्या सरी असतील, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात घाट परिसर वगळता इतरत्र फारसा पाऊस नाही. बुधवारपासून या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचीच शक्यता आहे. मराठवाड्यातही ११ जुलैपर्यंत हलक्या सरींचा अंदाज असून, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. मात्र, पावसाचा जोर हलका ते मध्यम स्वरूपाचाच असेल.

मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात १० ते १९ जुलैपर्यंतच्या दहा दिवसांत पावसाची केवळ उघडीप असेल,’ असे हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.

दरम्यान, अरबी समुद्रातील किनारपट्टीला समांतर असलेल्या हवेच्या कमी दाबाची दक्षिणोत्तर द्रोणीय स्थिती उथळ होईल. बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाब क्षेत्र उत्तर आणि वायव्येकडे मार्गक्रमण करत येत्या दोन दिवसांत दक्षिण राजस्थानमध्ये विरळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे कमकुवत होण्याची शक्यता आहे. म्हणूनच हलक्या पावसाची शक्यता असेल, असे खुळे यांनी स्पष्ट केले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत