10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननेताबा मिळवला तेव्हा पाकिस्तान आपल्या भू-राजकीयप्रयत्नात यशस्वी झाला असे वाटले होते.अफगाणिस्तानात रणनीतिक वर्चस्व मिळवण्यासाठीपाकिस्तानने 40 वर्षांहून अधिक काळ आपली राजकीयशक्ती, गुप्तचर यंत्रणा आणि लष्करी बळ खर्च केलेहोते. निरीक्षकांना वाटत होते की, आता पाकिस्तानअफगाणिस्तानातील पकड मजबूत करेल, आपलीपश्चिम सीमा सुरक्षित करेल आणि पुन्हा एकदा लक्षभारताकडे केंद्रित करेल. पण 5 वर्षांच्या आतचपरिस्थितीने अनपेक्षित वळण घेतले. आज पाकिस्तानला अफगाणिस्तानात एक शत्रुत्व पत्करणारे सरकार, ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या (टीटीपी) नेतृत्वाखालील हिंसाचार आणि सीमेवरील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था यांचा सामना करावा लागत आहे. प्रश्नअसा आहे की, एवढे मोठे यश मिळवूनही पाकिस्तानने आपले रणनीतिक नियंत्रण कसे गमावले?
या सर्वांच्या मुळाशी ड्युरंड रेषेचा जुना वाद आहे,जो 1893 मध्ये ब्रिटिश राजवटीत ठरवला गेला होता.पश्तून टोळीच्या भागांना विभागणारी ही वादग्रस्त सीमाएकाच वांशिक ओळख असलेल्या समुदायांनाही वेगळेकरते. अफगाणिस्तानच्या सरकारांनीही ही सीमा कधीचस्वीकारली नाही. खरे तर 1947 मध्ये अफगाणिस्तान हाएकमेव देश होता, ज्याने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांचेसदस्यत्व देण्यास विरोध केला होता. पाकिस्तानलाखात्री होती की, दशकांपासून तालिबानला पाठिंबादिल्याने त्यांचे सरकार शेवटी ड्युरंड रेषा मान्य करेल.पण त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला. कट्टरपंथी असूनहीतालिबानवर पश्तून राष्ट्रवादाचा प्रभाव आहे. अशास्थितीत पाकिस्तानी दावे मान्य करणे त्यांची घरगुतीविश्वासार्हता कमी करणारे ठरणार होते.
अनेक दशके तालिबानच्या कमांडर्सवरपाकिस्तानच्या आयएसआयचे वर्चस्व होते. कारणनाटोविरुद्धच्या लढाईत ते पाकिस्तानमधील सुरक्षितठिकाणांवर अवलंबून होते. मात्र, जेव्हा एखादीकट्टरपंथी चळवळ सत्तेवर येते तेव्हा तिचे स्वरूपबदलते. ऑगस्ट 2021 पूर्वी तालिबानला पाकिस्तानचीगरज होती, पण त्यानंतर परिस्थिती बदलली आणि आतापाकिस्तानला तालिबानची गरज पडू लागली. हामहत्त्वाचा बदल समजून घेण्यात पाकिस्तान अपयशीठरला. तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानच्यागुप्तचर प्रमुखांनी काबूलला दिलेली धावती भेट हात्यांच्या चुकीच्या आत्मविश्वासाचा पुरावा होता. आणिइथूनच परिस्थितीच्या आकलनात मोठी चूक सुरूझाली.
या बदलाचा पहिला परिणाम म्हणजे टीटीपी पुन्हाडोके वर काढू लागला. टीटीपी जरी अफगाणतालिबानपेक्षा वेगळी संघटना असली तरी त्यांचेवैचारिक आणि वांशिक संबंध एकच आहेत.सीमेपलीकडील युद्धभूमीवर या दोन्ही संघटनांच्यासहकार्याचा मोठा इतिहास आहे. सत्तेत आल्यानंतरअफगाण तालिबानने टीटीपीला पुन्हा सुरक्षित आश्रयदिला. वैचारिक एकतेमुळे केवळ पाकिस्तानला खुशकरण्यासाठी आपल्या साथीदार इस्लामिस्टलढाऊंविरुद्ध कारवाई करणे तालिबान सरकारसाठीकठीण आहे.
पाकिस्तानने अफगाण धोरण लादण्याचा प्रयत्नकेल्यानेही असंतोष वाढला आहे. पाकिस्तानच्यासीमेपलीकडील हल्ल्यांमुळे अविश्वास अधिकचवाढला, ज्यामुळे टीटीपीच्या पाकिस्तानविरोधीकारवायांना पोषक वातावरण मिळाले. जसजसेअफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध बिघडत गेलेतसतसा भारताने आपला महत्त्वाचा राजनैतिक प्रभावपुन्हा वाढवला आहे.भारत या स्थितीकडे कसे पाहतोयावर बरेच काही अवलंबून असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
दहशतवाद्यांचे ‘चांगले’ आणि ‘वाईट’असे वर्गीकरण करण्याच्या पाकिस्तानच्याधोरणाचे पितळ उघडे पडले आहे. अनेकदशकांपासून पाकिस्तानने अशादहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला, ज्याअफगाणिस्तान आणि भारतात त्यांचीरणनीती पूर्ण करत होत्या.

