Headlines

commonwealth games 2026 preeti pawar and jaismine lamboria win gold for india; बॉक्सिंगमध्ये भारतीय लेकींचा दमदार पराक्रम, प्रीती-जास्मिननं 5-0 ने जिंकले दोन्ही सामने; दहा मिनिटांत 2 गोल्ड खिशात


CWG 2026 Boxing Gold : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी अवघ्या १० मिनिटांत दोन सुवर्णपदकांची कमाई झाली. प्रीती पवार आणि जास्मिन लांबोरिया यांनी बॉक्सिंगमध्ये एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

preeti-pawar-gold, jaismine-lamboria-gold
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कॉमनवेल्थ गेम्समध्ये ( राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ) भारताच्या पदकांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. दोन पाठोपाठ सुवर्णपदके मिळाल्याने भारताची पदकसंख्या आता २५ वर पोहोचली आहे. आत्ताच समोर आलेल्या अपडेटनुसार आता भारतीय महिला बॉक्सर प्रीती पवार आणि जास्मिन लंबोरिया यांनी बॉक्सिंगच्या रिंगमध्ये आपली छाप पाडत देशाला ही दोन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

१० मिनिटांत दोन गोल्ड

५४ किलो वजनी गटात खेळताना प्रीती पवारने भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले आहे तर त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ५७ किलो वजनी गटात जास्मिन लंबोरियाने रिंगमध्ये उतरून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे १० मिनिटांच्या आत दोन सुवर्णपदके मिळाल्याने भारतीय गोटात आणि चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra TimesAsmita dey : सायकल मेकॅनिकच्या मुलीनं भारताला ज्युडोमध्ये दिलं पहिलं गोल्ड! कोण आहे अस्मिता डे? जिद्दी खेळाडूचा प्रवास वाचा

५-० ने जिंकले सामने; रिंगमध्ये संपूर्ण वर्चस्व

या दोन्ही खेळाडूंच्या विजयाची खास गोष्ट म्हणजे त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मिळवलेले पूर्ण वर्चस्व. दोन्ही बॉक्सरने आपापले सामने ५-० अशा दणदणीत फरकाने जिंकले. त्यांनी विरोधी खेळाडूंना पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. केवळ एका फेरीत थोडी चुरस पाहायला मिळाली, पण शेवटी दोन्ही भारतीय खेळाडूंनी बाजी मारली.

आज पदकांचा पाऊस पडण्याची शक्यता

दरम्यान आजच्या दिवसाच्या सुरुवातील भारताच्या खात्यामध्ये २३ पदकं होती, पण आता या दोन सुवर्णपदकांमुळे ही संख्या आता २५ पोहोचली आहे. अजूनही अनेक भारतीय बॉक्सर रिंगमध्ये उतरणार आहेत. सचिन, साक्षी आणि लव्हलिना बोर्गोहाय यांसारखे स्टार बॉक्सर आज आपले सामने खेळतील. त्यामुळे आज भारताच्या खात्यात आणखी अनेक पदके जमा होण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra TimesCommonwealth Games 2026 : फक्त एका किलोने हुकलं सुवर्ण, भाजी विक्रेत्याच्या नातवाने रौप्य पदकावर कोरलं नाव, कोण आहे लवप्रीतसिंग?

चाहत्यांसाठी आजचा दिवस खास

याशिवाय आजचा दिवस भारतासाठी खऱ्या अर्थानं ‘गोल्डन डे’ ठरू शकतो. कारण की दर १० ते २० मिनिटांनी पदकांची नवी बातमी समोर येण्याची शक्यता आहे. क्रीडाप्रेमींसाठी हे सर्व क्षण अत्यंत रोमांचक ठरताना दिसत आहेत. त्यामुळे आता सर्व भारतीयांचे लक्ष कॉमनवेल्थ गेम्सकडे लागलेले आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा