Headlines

Prapti Redkar : ‘त्याने मला स्पर्श केला’, रेल्वे स्थानकात छेड काढणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला, ‘झी मराठी’च्या अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग


Prapti Redkar : ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरची रेल्वे स्थानकात एका व्यक्तीनं छेड काढलेली. तो प्रसंग अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

Prapti Redkar On Her Harassment Incident
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आजकाल अनेक मराठी अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पारंगत असतात. अभिनयासोबतच इतर क्षेत्रातही त्या आपलं नाव कमावतात. कुणी उद्योगक्षेत्रात, तर खेळात पारंगत असतं. मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरसुद्धा कराटे चॅम्पियन आहे. शुटिंगसाठी प्रवास करताना अनेकवेळा छेड काढली जाते. मात्र, प्राप्ती अशा व्यक्तींना सडेतोड उत्तर देते.

मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकर झी मराठी वाहिनीवरील ‘ सावळ्याची जणू सावली ‘ या मालिकेमध्ये झळकत असून या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. या मालिकेमध्ये प्राप्ती ‘सावली’ची भूमिका साकारत आहे. यापूर्वी प्राप्तीनं ‘काव्यांजली’ या मालिकेमध्येही काम केलेलं. अभिनेत्री सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते. पण, अभिनेत्री कराटेमध्ये पारंगत आहे. प्राप्तीनं ब्लॅक बेल्ट पटकावला आहे. कराटे चॅम्पियन असल्याचा फायदा अभिनेत्रीला अनेकदा झाला आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे.
Maharashtra TimesMeena Kumari : 15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न, दारूचं व्यसन, वयाच्या 39 व्या वर्षी मृत्यू; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची हृदयद्रावक कथा

प्राप्ती रेडकरनं सांगितला प्रसंग

मुलाखतीदरम्यान प्राप्ती रेडकर म्हणाली की, ‘मी ट्रेनने शूटला जाते. तेव्हा तर रोजच होतं. कोणीतरी हात लावून जाणार आणि गर्दीत समजत नाही पटकन. मी मालाड स्टेशनला होते आणि प्लॅटफॉर्मवर जात होते. एक माणूस मला स्पर्श करून गेला. मला कळत नव्हतं कोण आहे. माझ्यासोबत माझ्या सेटवरचा कॉस्च्युम डिपार्टमेंटचा मुलगा होता. तो तर घाबरून पळून गेला. मग मी त्या छेड काढणाऱ्या मुलाची कॉलर पकडली आणि त्याच्या डोक्यातच फोन टाकला, त्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारलं. तो खाली पडला. त्या कॉस्च्युम डिपार्टमेंटच्या मुलाने मला वाचवायचं तर तोच पळून गेला. इथे किक बॉक्सिंग कमी आलंय.’ ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राप्ती बोलत होती.
Maharashtra TimesKangana Ranaut : ‘तरुणांची दिशाभूल करू नका, त्यासाठी मला लाखो रुपये मिळालेले’ जुन्या सिनेमातील व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौतचा संताप
‘आता माझी मालिका सुरू आहे म्हणून मी फाईट नाही करत. माझे सर आणि माझ्यासोबतचे स्पर्धक माझी खूप काळजी घेतात.’ असंही प्राप्तीनं सांगितलं.

मनाच्या जवळचा ‘हा’ खूपच खास ॲवार्ड होता, अभिनेता सिद्धार्थ जाधवने सांगितला किस्सा

दरम्यान, प्राप्तीला लहानपणापासून कराटेची आवड होती. ती कराटेसोबतचं किक बॉक्सिंगमध्येही पारंगत आहे. प्राप्ती रेडकरनं २०२१ मध्ये किक बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा