Headlines

युक्रेनवरील हल्ल्यात आणखी 9 जण ठार


रशियाचा दोन दिवसात दुसऱ्यांदा मोठा हल्ला

वृत्तसंस्था

कीव

युक्रेनची राजधानी कीव रशियाच्या विनाशकारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याने पुन्हा एकदा हादरली आहे. शनिवार, 1 ऑगस्ट रोजी पहाटे झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात किमान नऊ जण ठार झाले. तसेच अन्य 27 जण गंभीर जखमी झाले. मृत आणि जखमींमध्ये निष्पाप मुलांचाही समावेश आहे. गेल्या 48 तासांत युक्रेनवर रशियाने केलेला हा दुसरा मोठा हवाई हल्ला असून, त्यामुळे निवासी भागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास निवासी भागात हल्ले सुरू झाल्यानंतर मोठ्या स्फोटांच्या आवाजाने कीव शहर हादरून जागे झाले. या हल्ल्यांपूर्वी रशियाकडून अनेक प्राणघातक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs राजधानीच्या दिशेने येत असल्याचा अलर्ट युक्रेनच्या हवाई दलाने जारी केला होता. शहराच्या विविध भागांमध्ये पहाटे 3:20 वाजेपर्यंत स्फोट होत राहिले. कीवचे महापौर विटाली क्लिचको यांनी रहिवाशांना सतर्क करत तात्काळ सुरक्षित आश्रयस्थानांमध्ये स्थलांतरित होण्याचे आवाहन केले होते. या हल्ल्यांमध्ये सर्वात जास्त जीवितहानी डार्नित्स्की जिह्यात झाली. येथे सात जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. जखमींमध्ये चार मुलांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. क्षेपणास्त्रांनी केवळ इमारतींचेच नुकसान केले नाही, तर गोदामे, एक कार वॉश आणि एक पार्किंग लॉटही उद्ध्वस्त केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत