Headlines

soman rana wins gold shubham juyal silver in mens shot put f57 ; याला म्हणतात जिद्द! देशसेवेत पाय गमावला, जवान सोमन राणा ‘गोल्ड’न बॉय ठरला, शुभमनेही सिल्व्हर जिंकलं


CWG 2026 Shot Put Gold Silver : राष्ट्रकुल स्पर्धेत शॉट पुट F57 प्रकारात भारताची ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली आहे. सोमन राणाने सुवर्ण तर शुभम जुयालने रौप्य पदक जिंकून पहिले दोन्ही क्रमांक पटकावले आहेत.

CWG 2026 Shot Put Gold Silver
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ( Commonwealth Games 2026 ) शनिवारचा दिवस भारतासाठी अत्यंत खास ठरला. पुरुषांच्या शॉट पुट F57 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली. भारताच्या सोमन राणाने सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले, तर शुभम जुयालने रौप्यपदकावर (Silver Medal) आपले नाव कोरले. कॅमेरूनच्या सेड्रिक इड्रिस लेकेजो आजमदजीने १२.५७ मीटर थ्रो फेकत कांस्यपदक जिंकले.

भारताची ऐतिहासिक कामगिरी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉट पुट F57 स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिलेच सुवर्णपदक आहे. ही कामगिरी खूप मोठी आहे, कारण या खेळात भारताने पहिल्यांदाच एकाच वेळी दोन-दोन पदके जिंकली आहेत. ग्लासगो २०२६ मधील अ‍ॅथलेटिक्समध्ये सोमन राणाचे हे भारतासाठी तिसरे सुवर्णपदक ठरले, तर शुभम जुयाल सातवा रौप्यपदक विजेता बनला. या दोन पदकांसह भारताच्या एकूण पदकांची संख्या आता ३० वर पोहोचली आहे.

Maharashtra TimesCommonwealth games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारतीय लेकींचा दमदार पराक्रम, प्रीती-जास्मिननं 5-0 ने जिंकले दोन्ही सामने; दहा मिनिटांत 2 गोल्ड खिशात

१० खेळाडूंमध्ये भारतीय अ‍ॅथलीट्सचा खेळ

या १० खेळाडूंच्या फायनल सामन्यात सर्वांना एकापाठोपाठ एक सलग सहा संधी मिळाल्या. भारतीय खेळाडू सर्वात शेवटी मैदानात उतरले. शुभम जुयालने आपल्या पहिल्याच १३.०८ मीटर थ्रोसह आघाडी घेतली. त्याने आपल्या शेवटच्या प्रयत्नात १३.२८ मीटरचा सर्वोत्कृष्ट थ्रो फेकला. पण त्यानंतर आलेल्या सोमन राणाने दुसऱ्याच प्रयत्नात १३.४० मीटर थ्रो फेकत शुभमला मागे टाकले आणि सुवर्णपदकावर कब्जा केला.

Maharashtra TimesAsmita dey : सायकल मेकॅनिकच्या मुलीनं भारताला ज्युडोमध्ये दिलं पहिलं गोल्ड! कोण आहे अस्मिता डे? जिद्दी खेळाडूचा प्रवास वाचा

लँडमाइन ब्लास्टमध्ये गमावला होता पाय; जिद्दीच्या जोरावर जिंकले पदक

दरम्यान, सोमन राणाची ही कामगिरी त्याच्या कधीही हार न मानण्याच्या जिद्दीची कहाणी आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला ५ वर्षे राष्ट्रीय स्तरावर बॉक्सर राहिलेला सोमन २/८ गोरखा रायफल्समध्ये शिपाई होता. २००६ मध्ये पुंछ भागात झालेल्या सुरंग (लँडमाइन)स्फोटात त्याने आपला उजवा पाय गमावला होता. त्यानंतर २०१७ मध्ये जेव्हा तो कृत्रिम पाय बसवण्यासाठी गेला, तेव्हापासून त्याने पॅरा अ‍ॅथलेटिक्सला सुरुवात केली. आज त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत देशाचे नाव संपूर्ण जगात मोठे केले आहे.