Headlines

Chhatrapati Sambhajinagar:थंड -गरम वातावरणामुळे डास चिलटांचा उपद्रव वाढला ;विषाणूजन्य आजारांचा उद्रेक, साथीच्या आजारांना आमंत्रण


Chhatrapati Sambhajinagar: ऐन पावसाच्या दिवसांत किमान तीन आठवड्यांपासून पावसाने लावलेल्या गैरहजेरीमुळे थंड गरम वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी शहरात डास चिलटांचा उपद्रव वाढून आजारांचा उद्रेक झाला आहे.

डास चिलटांचा उद्रेक
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मागच्या किमान तीन आठवड्यांपासून पाऊस थांबला आहे आणि थंड-गरम वातावरणामुळे डास-चिलटांबरोबरच विविध विषाणुजन्य आजारांचा उपद्रवही कमालीचा वाढला आहे. परिणामी, समस्त रुग्णालयांमध्ये डेंगी, स्वाइन फ्लू सदृश रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पैकी काहींना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येत असल्याचे वैद्यकीय वर्तुळातून सांगण्यात आले.

डास-चिलटांचे प्रमाणात वाढ

सद्यस्थितीत डास-चिलट खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत व त्यामुळे घरात दहा मिनिटेही स्वस्थ बसणे शक्य होत नसून, मॉस्क्युटो रिपेलंट काम करत आहे का नाही, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. त्याचाच परिणाम म्हणून डास मारायची बॅट घेऊन बसण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, समस्त रुग्णालयांमध्ये डेंगी, स्वाइन फ्लू सदृश रुग्ण वाढले आहेत.

डेंगी व स्वाइन फ्लूची लक्षणे

या संदर्भात शहरातील फिजिशियन डॉ. अनंत कुलकर्णी म्हणाले, ‘सध्या बाह्य रुग्ण विभागामध्येसर्दी-खोकला-तापेचे रुग्ण आहेच; शिवाय डेंगी व स्वाइन फ्लूची लक्षणे असलेले रुग्णही वाढल्याचे नक्कीच जाणवत आहेत. यातील काही रुग्णांना दाखल करावे लागत असले तरी गंभीर गुंतागुंत दिसत नसल्याचा दिलासाही आहेच’.

पुन्हा स्वाइन फ्लू सदृश रुग्ण वाढले

फिजिशियन डॉ. आनंददीप अग्रवाल यांच्यानुसार, टायफॉइडचे रुग्णही काहीअंशी वाढल्याचेही दिसून येत आहे. पुन्हा स्वाइन फ्लू सदृश रुग्ण वाढले असले विषाणू पूर्वीचाच असल्याने, गंभीर गुंतागुंत सध्या तरी पाहायला मिळत नाही. मात्र मोजक्या ज्येष्ठ किंवा व्याधीग्रस्तांना निरीक्षणाखाली दाखल करावे लागत आहे, असेही डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

Maharashtra TimesNashik Crime: सहा कैद्यांचा कारागृह शिपायावर हल्ला; अधीक्षकांच्या संचार फेरीवेळी धुडगूस, काय घडलं?

पालिकेत केवळ १५ रुग्णांची नोंद

महापालिकेच्या आरोग्य विभागांर्तगत मागच्या दोन महिन्यांत डेंगीच्या निदानासाठी केली जाणारी ‘एनएस१’ ही चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या सुमारे १५ झाली आहे. अर्थातच, चाचणी केलेल्यांची ही नोंद असून, चाचणी न करणाऱ्या रुग्णांची संख्या कितीतरी पटींनी जास्त असू शकते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

Maharashtra TimesMumbai juhu Beach: जुहूच्या सुमुद्राला ‘टार बॉल्स’ची काळी किनार ,किनारा काळवंडला ;नागरिकांना सतर्कतेचा इशारा

डेंगी आजाराला कोणतेही विशिष्ट औषधोपचार नाहीत.

मुळात डेंगीची चाचणी केली किंवा नाही केली तरी उपचारांचा प्रोटोकॉल काही बदलत नाही. पुन्हा डेंगी आजाराला मलेरियाप्रमाणे कोणतेही विशिष्ट औषधोपचार नाहीत. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखणे, कोणतीही गुंतागुंत होणार नाही याची देखभाल घेणे महत्त्वाचे ठरते. अशा सर्वसाधारण स्थितीमुळे डेंगीचे अनेक रुग्ण चाचणी करत नाहीत, ही वस्तुस्थिती असली तरी त्यामुळे डेंगीचे रुग्ण कमी आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही, असेही तज्ज्ञांनी आवर्जून सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा