Headlines

जंतरमंतरवर जल्लोष-आनंदोत्सव

आंदोलक-विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी : दीपके यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन वृत्तसंस्था नवी दिल्ली शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी शनिवारी दुपारी पसरताच जंतरमंतरवर जल्लोष सुरू झाला. विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी ऐक्य चिरायू होवो’ अशा घोषणा देतानाच राष्ट्रगीतही गायले. तसेच नीट पेपरफुटीत प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास  सरकार आणि ‘सीजेपी’ यांच्यात पुन्हा चर्चा सुरू…

Read More

प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार

कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांची नवीन शिक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सध्याच्या खात्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही असेल. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या कलम 75 च्या खंड (2) अन्वये धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. तसेच प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या सध्याच्या खात्यांव्यतिरिक्त शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यालाही राष्ट्रपतींनी सहमती दर्शवली…

Read More

Nashik Earthquake | नाशिकच्या सुरगाण्यात भूकंपाचे 4 सौम्य धक्के

त.भा. प्रतिनिधीनाशिक जिह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यात आज सकाळी एकापाठोपाठ चार धक्के बसले, तर पालघर जिह्यातही भूकंपाचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि आसपासच्या परिसरात शनिवारी…

Read More

Mumbai Crime | डिजीटल अरेस्टची भिती दाखवून ८ कोटींची फसवणूक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत डिजिटल अटकेचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी एका ७३ वर्षीय पर्यटन आणि प्रवास व्यावसायिकाला डिजिटल अटकेची धमकी देऊन १४ दिवसांत ७.९ कोटी रुपयांचे नुकसान केले. मुंबई पश्चिम सायबर पोलीस आता अंधेरी येथील रहिवासी असलेल्या या व्यावसायिकाविरुद्धच्या सायबर फसवणुकीचा तपास करत आहेत. संपूर्ण प्रकरण काय आहे?तक्रारीनुसार, ५…

Read More

16.51 लाखांचा दंड न भरल्यास सालेमला 18 वर्षांची अतिरिक्त शिक्षा सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती

मुंबई, दि. 24 (प्रतिनिधी) मुंबईवरील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी गँगस्टर अबू सालेमने जर 16.51 लाखांचा प्रलंबित दंड भरला नाही, तर त्याला आणखी 18 वर्षे 6 महिने तुऊंगात राहावे लागेल, अशी माहिती पेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी विशेष न्यायालयात दिली. अबू सालेम आणि कारागफह प्रशासनाने दंडाच्या रकमेबाबत न्यायालयात स्पष्टीकरण मागितले होते. त्यावर सीबीआयने आपले उत्तर…

Read More

Monsoon updates | पावसाचा किंचित ब्रेक कोकण, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पाऊस

त. भा. प्रतिनिधी पुणेशनिवारी राज्याच्या अनेक भागात पावसाने उसंत घेतली. तसेच दिवसभरात सुर्यनारायणाचे दर्शन झाल्याने दिलासा मिळाला. दरम्यान, रविवारी कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. उत्तरपश्चिम बंगालचा उपसागर तसेच दक्षिणपश्चिम राजस्थानच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, याच्या प्रभावामुळे ओरिसा राज्यात 28 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान,राज्यातील…

Read More

‘टीईटी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि साथीदाराला बिहारमध्ये अटक‘ आरोपींची संख्या 14 वर पोहोचली‘

ठाणे दि.25 प्रतिनिधीदेशात पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला दुसरीकडे सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी तब्बल 36 दिवसानंतर दिल्लीतील जंतर मंतर येथून आंदोलन मागे घेतल्याची घोषणा दिली. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टिईटी) प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील अखेर मुख्य सूत्रधार विजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याचा साथीदार इंद्रजित सिंग या दोघांना ठाणे…

Read More

जगातील सर्वात सुंदर कॉलेज

जगभरात अनेक विद्यापीठे आहेत, जी स्वत:च्या शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु पोलंडमधील व्रोकलॉ विद्यापीठ स्वत:च्या भव्य आणि मनमोहक वास्तुकलेसाठी वेगळे स्थान राखून आहे. याला जगातील सर्वात सुंदर कॉलेज मानले जाते, येथील क्लासरुम, हॉल आणि इमारती पाहून जणू एखादी परीकथा जिवंत झाल्याचे वाटू लागते. कॉलेजचे विद्यार्थी येथे क्लास बंक करण्याऐवजी दररोज येण्यासाठी उत्साहित असतात. व्रोकलॉ विद्यापीट…

Read More

सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मोहनतारा देसाई यांचे निधन

सावंतवाडी शहर वार्ताहर : शहरातील सालईवाडा येथील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मोहनतारा मनोहर देसाई (91) यांचे 20 जुलै रोजी वृद्धापकाळाने पुणे येथे निधन झाले. काही वर्षापासून त्या पुणे येथील आपल्या मुलांकडे राहत होत्या. मनमिळाऊ व शांत स्वभाव होता. शिस्तप्रिय शिक्षका म्हणून त्यांची ओळख होती. पुणे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात दोन मुलगे, दोन…

Read More

शिरोडा वेळागर येथे जखमी ‘ऑलिव्ह रिडले’ला जीवदान

वेंगुर्ले/ प्रतिनिधी : शिरोडा वेळागर येथे आढळून आलेल्या जखमी अवस्थेतील ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवाला सुरक्षितरित्या पकडून कांदळवण विभाग मालवणच्या ताब्यात देण्यात आले. सदर कसवावर उपचार करून पूर्ण तंदुरुस्त झाल्यावर नैसगिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.शुक्रवारी सायंकाळी उशिरा शिरोडा – वेळागर येथील समुद्र किनाऱ्यावर जखमी अवस्थेतील हे कासव स्थानिकांना आठळून आले होते. होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष…

Read More