Headlines

भारत, पाक संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

आशियाई क्रीडा स्पर्धा, नागोया, जपान लोगो वृत्तसंस्था, नवी दिल्ली चीनमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूष आणि महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान या स्पर्धेतील विद्यमान विजेते संघ भारत आणि पाकिस्तान यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरूषांच्या क्रिकेटला 24 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून 1 ऑक्टोबरला या क्रीडा…

Read More

Union Minister Resign| केंद्रीय मंत्री बिट्टू यांचा पदत्याग

► वृत्तसंस्था नवी दिल्ली केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य नवनीतसिंग बिट्टू यांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला आहे. त्यांचे त्यागपत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असल्याची माहिती देण्यात आली आहे. बिट्टू हे राजस्थानमधूर राज्यसभेवर निवडून आले होते. प्रथम ते काँग्रेसमध्ये होते. साधारणपणे दोन वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनंतर त्यांना राजस्थानातून राज्यसभेवर पाठविण्यात आले…

Read More

Aditya Thackeray | आंदोलन तुम्ही करा, गुन्हे आम्ही घेतो आदित्य ठाकरे यांची तरुणांना ग्वाही

त.भा. प्रतिनिधी, मुंबई : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरे रविवारी दादर येथे मोर्चा काढणार आहेत, तर त्याची पूर्वतयारी म्हणून शिवाजी पार्क येथे आदित्य आणि अमित ठाकरे या ठाकरे बंधूंनी तिरंगा रॅली काढली. यावेळी तरुणाई मोठ्या संख्येने जमा होती. या तरुणाईचा हुरूप वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आंदोलन स्थळावरूनच दिल्लीत…

Read More

आंध्र-कर्नाटक आर्थिक कॉरिडॉर विकसित होणार 4,294 कोटींच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

► वृत्तसंस्था नवी दिल्लीकेंद्र सरकारने आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दरम्यान एका महत्त्वपूर्ण आर्थिक कॉरिडॉरच्या विकासाला मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी 4,294 कोटी रुपयांच्या मोठ्या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे दोन्ही राज्यांमधील पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि आर्थिक घडामोडींना गती मिळेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक कॉरिडॉर…

Read More

CJP Protest | ‘सीजेपी’ प्रतिनिधींची केंद्र सरकारशी चर्चा आंदोलकांनी ठेवल्या सरकारसमोर मागण्या, आज पुन्हा बोलणी

► वृत्तसंस्था नवी दिल्ली केंद्र सरकारने नीट प्रश्नपत्रिकाफुटीप्रश्नी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) या संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा केली आहे. ही चर्चा दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’ येथे साधारणत: 2 तास झाली. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी चर्चेत भाग घेतला. तर संघटनेच्या वतीने तिचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास…

Read More

Trump Meet zelensky |पुढील आठवड्यात ट्रम्प-झेलेन्स्की भेट

► वृत्तसंस्था वॉशिंग्टनयुक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ही भेट वॉशिंग्टनमध्ये दिवंगत अमेरिकी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या अंत्यविधीदरम्यान होणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही नेत्यांमध्ये युद्ध आणि भविष्यातील रणनीतींसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय झेलेन्स्की यांच्या अमेरिका दौऱ्याची पूर्वतयारी करत…

Read More

वंदे मातरमसंबंधी विधेयक राज्यसभेत सादर गायनात व्यत्यय आणल्यास तुरुंगवासाची शिक्षा : गदारोळामुळे चर्चेत व्यत्यय

► वृत्तसंस्था नवी दिल्लीसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळाने गाजला आहे. सलग पाचव्या दिवशी शुक्रवारीही दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा सुरू होऊ शकली नाही. गदारोळामुळे अध्यक्षांनी दिवसाचे कामकाज तहकूब केले. मात्र, राज्यसभेत शुक्रवारी कामकाज तहकूब होण्यापूर्वी, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी वंदे मातरम राष्ट्रगीताशी संबंधित असलेले ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, 2026’ सादर केले. ‘वंदे मातरम’चा…

Read More

CJI on Media | बेजबाबदार वृत्ते प्रसारित करू नका! सरन्यायाधीश सूर्य कांत वृत्तमाध्यमांवर संतप्त

► वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेवर नेण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याप्रकरणी सादर करण्यात आलेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नकार दिला, असे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. तथापि, हे वृत्त धादांत खोटे असून वृत्तपत्रे आणि माध्यमांनी बेजबाबदारपणे ते प्रसिद्ध केले आहे. अशा प्रकारची कोणत्याही याचिका अद्याप सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेली नाही,…

Read More

Paper Leak bill | पेपरफुटी सुधारणा विधेयकाला कॅबिनेटची मंजूरी, गुन्हा सिद्ध झाल्यास कडक शिक्षेची तरतूद

नीट पेपरफुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, मंत्रिमंडळाने पेपरफुटी सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अधिक कठोर करण्याच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. सरकार पुढील आठवड्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात संसदेत हे सुधारित विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे. या विधेयकात पेपरफुटी करणाऱ्या माफियांविरोधात कठोर तरतुदी असतील. या विधेयकानुसार पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची…

Read More

Rahul Gandhi Protest| आंदोलनात डोळा गमावलेल्या विद्यार्थ्याला राहुल गांधींनी आणले माध्यमांसमोर

जंतर मंतर ते संसद मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापरावरून राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लक्ष्य केले. त्यांनी आरोप केला की, शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर बळाचा वापर करण्यात आला आणि सरकार या संपूर्ण घटनेमागील सत्य लपवत…

Read More