Monsoon 2026 Arrives: आनंदमेघ नि चिंतेचे मळभ – monsoon has finally arrived in maharashtra on tuesday 23 june 2026
पंधरा दिवसांच्या विलंबाने का होईना, राज्यात मान्सूनच्या आगमनाची आनंदवार्ता मिळाली. त्यामुळे राज्यातील नागरिक सुखावून जाणे साहजिकच. गेले काही दिवस कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून कोकणातच रेंगाळला होता. आता पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी त्याच्या प्रवासाला गती मिळाली. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भ-मराठवाड्यात मान्सूनचे ढग पोहोचले आहेत. येत्या दोन दिवसांत उर्वरित भागांतही ते दाखल होतील. त्यानंतर…
