![]()
रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता कर्नाटकच्या रामनगर बाजारपेठेपर्यंत जावे लागणार नाही. त्यासाठी जालन्यातच रेशीम कोष बाजारपेठ विकसित करण्यात आली आहे. कर्नाटकच्या बाजारपेठेत 1 टक्के शुल्क आकारले जाते. ते येथे माफ राहणार आहे. शिवाय कोषाचे वैज्ञानिक ग्रेडिंग उपलब्ध असेल.ड्रायिंगची अत्याधुनिक सुविधा असेल. लिलाव आणि व्यवहार डिजिटल होतील. येथे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी निवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बाजारपेठेचे उद्घाटन केले जाणार आहे. जालना बाजार समितीत गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेली ही रेशीम कोष बाजारपेठ आता स्वतःच्या जागेत स्थलांतरित होत आहे. 14 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बाजारपेठेचे उद्घाटन होईल.2018 पासून सुरू असलेल्या या बाजारपेठेत आतापर्यंत 37,871 शेतकऱ्यांनी रेशीम कोष विक्रीसाठी आणला आहे. त्यातून 3,271.71 टन कोषांची विक्री करण्यात आली आहे. 154 कोटी 32 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. आता अडीच एकर क्षेत्रावर ही बाजारपेठ उभारण्यात आली आहे. तुती लागवड ते रेशीम वस्त्र जालन्यात तुती लागवड, अंडीपुंजनिर्मिती, कीटक संगोपन, कोष उत्पादन, कोष बाजारपेठ, ऑटोमॅटिक रिलिंग,धागा, रंगाई, हातमाग आणि तयार रेशीम वस्त्र अशी संपूर्ण साखळी उभारली जात आहे. त्यामुळे ‘तुतीच्या शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत’ जालन्याचा रेशीम उद्योग नेण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण महिलांना हातमागाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावरही भर दिला जात आहे. लिलाव व व्यवहार डिजिटल आधुनिक लिलाव हॉल, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोष खरेदी-विक्री प्रक्रिया पारदर्शक होईल. कोषाला बाजारातील योग्य दर मिळण्यास मदत होईल. गुणवत्ता तपासण्यासाठी ग्रेडिंग व कोष परीक्षण केंद्र आहे. गुणवत्तेनुसार कोषाचे मूल्यांकन होईल. चांगल्या दर्जाच्या कोषाला योग्य भाव मिळेल. शेतकऱ्यांसाठी निवासाची सोय जालना हे महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना जवळच्या बाजारपेठेत कोष विक्री करता येणार आहे. येथे दूरवरून येणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्यात आली आहे. येथे एकाचवेळी 16 शेतकरी मुक्कामासाठी थांबू शकतील.त्यामुळे बाजारपेठेत येऊन व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना सोय होणार आहे. शेतकरी केंद्रित बाजारपेठ ही रेशीम कोष बाजारपेठ केवळ खरेदी-विक्रीचे केंद्र नाही. ही बाजार व्यवस्था शेतकऱ्यांना संपूर्ण सुविधा एकाच ठिकाणी देते. येथे शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पुढील टप्प्यात कोषापासून धागा, धाग्यापासून तयार वस्त्रनिर्मितीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी जालन्यात विकसित करण्याचे नियोजन आहे.
– अजय मोहिते, रेशीम विकास अधिकारी एक्सप्लेनर 3 हजार रुपये अधिक भाव मिळणार Q. सध्या व बाजारपेठेनंतर काय भाव मिळेल?
A. सध्या 65 हजार रुपये क्विंटल दर आहे. त्यातकिमान 3 हजारांची वाढ होणे अपेक्षित आहे. Q. इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोषआणण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
A. देशातील कुठलाही शेतकरी विक्रीसाठी कोष आणूशकतो. रात्री उशिरा आले तर मुक्कामाची सुविधा आहे. Q. माल विकल्यानंतर पैसे किती वेळेत मिळेल?
A. पावती जागेवर मिळेल. पैसे 24 तासांत खात्यावरजमा होतील. Q. बाजारपेठेतील खरेदीदार स्थानिक असेल कीइतर राज्यांतील असतील?
A. महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल येथील खरेदीदारअसणार आहेत.
Source link
जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री:24 तासांत पैसे खात्यावर, वैज्ञानिक ग्रेडिंग, ड्रायिंग अन् डिजिटल लिलावाची सुविधा
