पूरग्रस्त 16 जणांचे वाचले प्राण:जिल्हा बचाव पथकाने एकाच रात्री दोन आव्हानांवर केली मात
अमरावती जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा येथे आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या १६ जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाने एकाच रात्री सुरक्षित बाहेर काढले. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पथकाने धाडसी बचावकार्य करत अनेकांचे प्राण वाचवले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे बेंबळा नदीला आलेल्या पुरामुळे ९ जण छतावर अडकले होते. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी रात्री ११ च्या सुमारास अचानक वाढले…
