Headlines

Bombay High Court slams Tukaram Mundhe FDA over Navi Mumbai Hotel Licence revoke; तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता, अन्न आणि औषध प्रशासनाला दंड लावावा लागेल, लायसन्स निलंबन मागे न घेतल्याने कोर्टाचा संताप


Bombay High Court on FDA : एफडीएकडूनही नियमाप्रमाणे कार्यवाही झाली नसल्याने व्यावसायिकांचे १५ दिवसांचे नुकसान झाले त्याचे काय? त्यामुळे आम्हाला एफडीएला दंड लावण्याचा विचार करावा लागेल’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशा​सनाला (एफडीए) सुनावले.

Tukaram Mundhe FDA Bombay High Court Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘नवी मुंबईतील याचिकाकर्त्या रेस्टॉरंटकडून शंभर टक्के नियमपालन होऊनही त्यांच्यावरील परवाना निलंबनाची कारवाई मागे का घेण्यात आली नाही? एफडीएकडूनही नियमाप्रमाणे कार्यवाही झाली नसल्याने त्या व्यावसायिकांचे १५ दिवसांच्या नुकसानीचे काय? त्यामुळे आम्हाला एफडीएला दंड लावण्याचा विचार करावा लागेल’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) सुनावले. त्याचवेळी त्या रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करण्याचा एफडीएचा आदेशही रद्दबातल केला.

शंभर टक्के पालन, तरी निलंबन आदेश कायम

नवी मुंबईतील बेलापूर येथील हॉटेल पवन बार अँड रेस्टॉरंटने एफडीएच्या कारवाईला आव्हान दिले होते. ‘एफडीएने २९ जून रोजी आमच्या रेस्टॉरंटची तपासणी करून नियमांचे ६३ टक्के पालन असल्याचे म्हटले आणि ३० जूनला परवाना निलंबित केला. त्याविरोधात आम्ही संबंधित प्राधिकरणाकडे अपिल केले. त्यामुळे १४ जुलैला पुन्हा तपासणी केली असता, शंभर टक्के पालन झाल्याचे प्रमाणपत्र दिले. तरी परवाना निलंबनाचा आदेश एफडीएने रद्द केला नाही’, असे ॲड. मयूर खांडेपारकर व ॲड. सागर शेट्टी यांनी म्हटले.
Maharashtra TimesDr Hemika Agarwal : घटस्फोटाने मन खिन्न, प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञाने मृत्यूला कवटाळलं, ४० व्या वर्षी दुर्दैवी अखेर

आर्थिक नुकसानीबद्दल एफडीएला दंड?

याची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने अत्यंत गंभीर दखल घेतली. ‘एफडीए विभागाची समस्या ही आहे की, तो इतक्या वर्षांत झोपेत होता आणि आता जागा झाला आहे. मात्र, याचिकाकर्त्याच्या प्रकरणात शंभर टक्के नियमपालन झाल्याचे प्रमाणित होऊनही निलंबन सुरूच राहिल्याने रेस्टॉरंट मालकाला झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल एफडीएला दंड लावण्याचा विचार करावा लागेल. आम्ही यावेळी शांत राहिलो, तर आमचे कर्तव्य बजावण्यात आम्ही अपयशी ठरू’, असे खंडपीठाने नमूद केले.
Maharashtra TimesDisha Salian : आदित्य ठाकरेंवर FIR नोंदवून CBI तपास व्हावा, दिशा सालियानच्या वडिलांची विनंती, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडसावलं

जळगावात पाच हॉटेलांचे परवाने ‘एफडीए’कडून निलंबित

दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी मोहीम हाती घेतली असून, गेल्या काही महिन्यांत विविध ठिकाणी धडक कारवाया करण्यात आल्या आहेत. अस्वच्छ हॉटेल्स, प्रतिबंधित गुटखा, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि दूषित दूध याविरोधात झालेल्या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाच हॉटेलचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.