Headlines

Bombay High Court questions police over Disha Salian Death investigation father demands CBI inquiry Crime News; आदित्य ठाकरेंवर FIR नोंदवून CBI तपास व्हावा, दिशा सालियानच्या वडिलांची विनंती, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना खडसावलं


Disha Salian Death Case : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून सीबीआय तपासाचा आदेश देण्याची विनंती दिशा सालियनच्या वडिलांनी ॲड. नीलेश ओझा यांच्यामार्फत केली आहे.

Disha Salian Aaditya Thackeray Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘दिशा सालियानच्या मृत्यूबाबत वडिलांनी संशय व्यक्त केला होता, तर पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? अपघाती मृत्यूचे प्रकरण का दाखल केले? कोणत्या बाबींमुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यापासून रोखण्यात आले?’ असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई पोलिसांसमोर उपस्थित केला.

दिशा सालियान गूढ मृत्यू

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर असलेल्या दिशाचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. चौकशीअंती दिशाने जीव दिल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी गेल्या वर्षी याचिका करून आपल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप केला आहे. या प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर नोंदवून सीबीआय तपासाचा आदेश देण्याची विनंतीही सालियन यांनी ॲड. नीलेश ओझा यांच्यामार्फत केली आहे.
Maharashtra TimesCrime News : कॅब चालकाचे प्रवाशाशी प्रेमसंबंध जुळले, बायकोचा काटा काढला अन् तिच्यावरच खापर फोडलं, दोघं अटकेत

अपघाती मृत्यूची नोंद

याविषयी न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मुख्य सरकारी वकील शिशिर हिरे यांनी बाजू मांडली. शिशिर हिरे यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाची नोंद ‘अपघाती मृत्यू’ अशी करण्यात आली होती आणि दोनदा चौकशी करण्यात आली; दोन्ही वेळा तिने जीव दिल्याचेच निष्पन्न झाले. या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांवरुनही या निष्कर्षाला दुजोरा मिळाला” असे ते म्हणाले.
Maharashtra TimesDr Hemika Agarwal : घटस्फोटाने मन खिन्न, प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञाने मृत्यूला कवटाळलं, ४० व्या वर्षी दुर्दैवी अखेर

फोटोनुसार दिशाच्या डोक्याला दुखापत

न्यायालयाच्या खंडपीठाने असाही प्रश्न उपस्थित केला की, शवविच्छेदन अहवालानुसार, इतक्या उंचावरुन पडूनही संबंधित व्यक्तीच्या शरीरावर कोणतीही दुखापत का आढळली नाही. “जर एखादी व्यक्ती १४ मजल्यांच्या उंचीवरुन खाली पडली, तर तिच्या शरीरावर काहीच जखमा होणार नाहीत का?” असा प्रश्न न्यायमूर्ती डांगरे यांनी विचारला. त्यावर हिरे यांनी सांगितले की, छायाचित्रांनुसार संबंधित व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली होती. पुढील सुनावणी २४ ऑगस्टला आहे.