Headlines

Mumbai Police Scam: मुंबई पोलिस दलात मोठा घोटाळा; तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, प्रकरण काय? – mumbai police salary scam 6.5 crore fraud case registered against 5 policeman


Mumbai Police Salary Scam: संशय निर्माण झाल्यानंतर ऑडिट करण्यात आले. या ऑडिटमध्ये २०१९ आणि २०२० या वर्षांतील काही महिन्यांच्या पगाराच्या रकमांमध्ये मोठी तफावत आढळली.

mumbai police
मुंबई पोलीस(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : इतरांचे कारनामे, घोटाळे उघडकीस आणणाऱ्या, अनेक मोठ्या घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिस दलातच कोट्यवधींचा वेतन घोटाळा घडला आहे. पोलिसांचे वेतन तसेच इतर प्रशासकीय काम करणारे मंत्रालयीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला असून, शासनाच्या सुमारे साडेसहा कोटी रुपयांवर डल्ला मारला आहे.

आठ ते दहा जणांना पोलिस असल्याचे दाखवून त्यांच्या नावाने असलेल्या बँक खात्यांवर पगाराच्या रकमा पाठविण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी पगार तसेच इतर प्रशासकीय कामे पहाणाऱ्या पाच अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरुद्ध समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra TimesTukaram Mundhe : तुकाराम मुंढे अडचणीत येण्याची शक्यता, FDA ला दंड लावावा लागेल, लायसन्स निलंबन मागे न घेतल्याने कोर्टाचा संताप
उत्तर प्रादेशिक विभाग कार्यालयातील पोलिस निरीक्षकाच्या तक्रारीवरून समतानगर पोलिस ठाण्यात, शासनाची फसवणूक करणे, पुरावे नष्ट करणे, कट रचणे अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यांचा डेटा जुन्या ‘सेवार्थ’ वेतन प्रणालीतून नवीन प्रणालीमध्ये स्थलांतरित करताना ही संशयास्पद अनियमितता समोर आली. जे लोक पोलिस कर्मचारी नव्हते, त्यांना पोलिस कर्मचारी म्हणून दाखवण्यात आले आणि त्यांच्या नावावर वेतनाची प्रक्रिया करण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याबाबत संशय निर्माण झाल्यानंतर ऑडिट करण्यात आले. या ऑडिटमध्ये २०१९ आणि २०२० या वर्षांतील काही महिन्यांच्या पगाराच्या रकमांमध्ये मोठी तफावत आढळली.

मुंबई पोलिस दलातील प्रत्येक प्रादेशिक कार्यालयात पोलिसांचे पगार काढण्याचे काम चालते. मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी प्रादेशिक विभागात मोडणाऱ्या अधिकाऱ्यांचे कामाचे दिवस, थकबाकी तसेच इतर तपशील तयार करून लेखा विभागाकडे त्याचे देयक मंजुरीसाठी पाठवतात. हे काम करणाऱ्यांनी आठ ते दहा जणांच्या बोगस नोंदी करून पाठवल्या. अनियमितता समोर आल्यानंतर जेव्हा पगार घेणाऱ्या पोलिसांची नावे तपासण्यात आली, तेव्हा हे आठ ते दहा जण पोलिस नसल्याचे आढळले. ज्यांच्या खात्यांमध्ये पैसे पाठविण्यात आले हे नेमके कोण आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्याचबरोबर अशाप्रकारे धुळे आणि लातूर येथे कोट्यवधींचा पगार घोटाळा घडला होता, त्याचा या प्रकरणाशी संबंध आहे का, हेदेखील तपासले जात आहे.

Maharashtra TimesRohit Pawar : डॉक्टरांचा सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला, रोहित पवार यांनी दिली प्रकृतीबद्दल माहिती
यांच्या नावे काढले पगार
समतानगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, रामदास भोगले, सुधाकर कदम, सरजू यादव, भगवत भोसले, गुणाजी खावकर, महादेव हलदणकर, राजेंद्र सोनार, उत्तम थोरात, सूर्यकांत पाटील आणि पांडुरंग कदम या व्यक्तींच्या नावे पगार काढण्यात आले आहेत. या व्यक्ती पोलिस दलामध्ये कार्यरत नसल्याचे समोर आले आहे.

गुन्ह्यातील आरोपी
तत्कालीन प्रशासकीय अधिकारी रामकिशन गोस्वामी, नागेश तळवडेकर, विजया चव्हाण, प्रमुख लिपिक अजय राठोड, वरिष्ठ लिपिक अमोल मेश्राम यांच्यासह इतर आरोपींवर हा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा