Headlines

Amravati Chikhaldar Water Shortage Citizens Crowd Waiting for Water Tanker; डोक्यावर हंड्याचे इमले, घोटभर पाण्यासाठी महिलांची जीवघेणी तडफड; महाराष्ट्रातील पाणीटंचाईचं विदारक चित्र


Amravati Water Shortage : राज्यात बऱ्याचठिकाणी भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण दिसतेय. या महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं विदारक चित्र आहे.

Amravati Water Shortage
चिखलदरा पाणीटंचाई(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
गजेंद्र बडनेरकर, अमरावती : चिखलदरा तालुक्यातील दुर्गम खडीमल गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे ग्रामस्थांचे हाल वाढले आहेत. टँकर गावात दाखल होताच विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळत आहे. घोटभर पाण्यासाठी जीवघेणी तडफड होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. विशेषत: महिलांना घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत तासन्‌तास पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित

मेळघाटातील घनदाट जंगल परिसरात वसलेल्या खडीमल गावाची लोकसंख्या सुमारे १२०० ते १५०० दरम्यान आहे. चिखलदरा मुख्यालयापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावरील हे गाव अत्यंत दुर्गम मानले जाते. मात्र, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके उलटूनही गावाची पाणीटंचाई कायम असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Maharashtra TimesBandu Andekar: बंडू आंदेकर तुरुंगातून सूत्र हलवतोय? तपासादरम्यान धक्कादायक बाबी समोर; पोलिसांकडून अखेर कठोर पाऊल
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाने विविध योजनांतून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून पाणीपुरवठा योजना राबविल्या. मात्र, त्या केवळ कागदोपत्रीच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात टँकरद्वारे तात्पुरती उपाययोजना केली जाते; मात्र कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती कायम आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने खडीमल गावासाठी कायमस्वरूपी जलयोजना राबवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.

देशपातळीवर दखल तरी व्यथा कायम

खडीमलच्या पाणीप्रश्नाची दखल विविध स्तरांवर घेतली गेली, देशपातळीवरही या गावाची व्यथा पोहोचली; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आदिवासी बांधवांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ती प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Maharashtra TimesVidhan Parishad Election: विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का; 70 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, राजकारणात मोठी खळबळ

टँकरसमोर महिलांची झुंबड

खडीमलच्या पाणीप्रश्नाची दखल विविध स्तरांवर घेतली गेली, देशपातळीवरही या गावाची व्यथा पोहोचली; मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आदिवासी बांधवांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ती प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा