Amravati Girls Assault Case : अयानला महागडे स्मार्टफोन वापरणे, आलिशान हॉटेलमध्ये पार्टी करणे आणि मुलींवर पैसे उधळण्याचा शौक असल्याने त्याने आईचे दागिने गुपचूप विकल्याचं बोललं जात आहे
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. यासोबतच पोलिसांनी दुसऱ्याही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करीत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाचा आवाका वाढवला आहे, अशी माहिती अमरावतीचे ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. धक्कादायक म्हणजे, अय्याशीसाठी अयानने आपल्या आईचे सोन्याचे दागिने विकल्याचंही समोर आलं आहे.
अयानला महागडे स्मार्टफोन वापरणे, आलिशान हॉटेलमध्ये पार्टी करणे आणि मुलींवर पैसे उधळण्याचा शौक होता. काही दिवसांपूर्वी त्याचा इन्स्टाग्राम व्हिडीओ समोर आला, ज्यात त्याच्याकडे भरपूर कॅश असल्याचं दिसत होतं. ही रोकड आईचे दागिने गुपचूप विकून अयानने मिळवल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलेलं आहे. याबाबत अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
उजेर खानवर नवीन गुन्हा
विशाल आनंद म्हणाले, या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी उजेर खान इकबाल खान (वय २०) रा. परतवाडा याने गावातीलच एका १६ वर्षीय मुलीशी मोबाइलवरून संपर्क वाढविला होता. पालकांनी समज देऊनही त्याने हे प्रकार सुरूच ठेवले होते. अखेर मुलीच्या आईने परतवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या तक्रारीच्या आधारे उजेर खानवर नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तरुणी आरोपींसोबत गेल्याची चर्चा चुकीची
वझ्झर धरण परिसरात एका तरुणीच्या आरोपींसोबत जाण्याबाबत पसरलेली चर्चा पूर्णपणे चुकीची असून, ती मुलगी सुरक्षित आहे. तिचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे विशाल आनंद यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील एका १५ वर्षीय पीडितेचा जबाब विशेष तपास पथकातील महिला अधिकारी आणि बालकल्याण अधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आला आहे. हा जबाब आता मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आला आहे. पोलिस अधीक्षकांनी इतर पीडितांनाही निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जबाब नोंदवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पीडितेची ओळख कायदेशीररित्या पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
१८ व्हिडीओ, ३९ फोटो जप्त
आरोपींच्या मोबाइलमधून आठ पीडितांचे १८ व्हिडीओ आणि ३९ फोटो जप्त करण्यात आले आहेत. तपासाचा प्रत्येक पैलू बारकाईने तपासला जात असून, कुणाच्याही कल्पनेपलीकडच्या पद्धतीने पुरावे गोळा केले जात आहेत, असेही अधीक्षक आनंद यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीच जप्त केलेले पाच मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत. त्याव्यतिरिक्त आणखी सहा मोबाइल, एक लॅपटॉप, एक टॅब आणि एक हार्डडिस्क एसआयटीने जप्त केली आहे. हे सर्व साहित्य तातडीने विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असल्याचे विशाल आनंद यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा