Shrikant Shinde यांना मोदींच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळणार? राज्यमंत्री होणारा खासदार कोण? – shrikant shinde cabinet minister in union cabinet reshuffle 2026
Shrikant Shinde यांना मोदींच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळणार? राज्यमंत्री होणारा खासदार कोण? – shrikant shinde cabinet minister in union cabinet reshuffle 2026
एकनाथ शिंदेंचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना थेट केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्याच पक्षाचे राज्यमंत्री असलेले बुलढाण्याचे प्रतापराव जाधव यांचा सरकारमधून पत्ता कट होण्याची शक्यता आहे… प्रतापराव जाधव यांच्या कामकाजाबद्दल केंद्रात नाराजी असल्यामुळेच त्यांच्या ऐवजी एक नवा गडी केंद्रात दाखल होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या सहा खासदारांपैकी एकाला हे राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. ज्यासाठी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले परभणी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे…नव्या चेहऱ्यांमध्ये आता कुणाला संधी मिळणार, कुणाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे… ठाकरेंचे खासदार फोडल्यानंतर श्रीकांत शिंदेंना घेतलेल्या तिरुपती बालाजीच्या दर्शनाची का चर्चा होतेय आणि मराठवाड्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे कोणता नवा डाव टाकणार हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत