Adinath Kothare And Urmila Kothare Take Divorce ; Adinath And Urmila Kothare Divorce : चर्चा खऱ्या ठरल्या; मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टार कपल आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांचा घटस्फोट
Adinath Kothare And Urmila Kothare Take Divorce ; Adinath And Urmila Kothare Divorce : चर्चा खऱ्या ठरल्या; मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टार कपल आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांचा घटस्फोट
मराठी सिने इंडस्ट्रीतील स्टार कपल अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे या दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल गेल्या काही वर्षापासून चर्चा सुरू होत्या, आता या दोघांनी अधिकृतपणे घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. सोशल मीडिया पोस्ट द्वारे त्यांनी ही वैयक्तिक आयुष्यातील मोठी अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
आदिनाथ कोठारे याने उर्मिला कोठारे सोबत संयुक्तपणे एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये लिहिले आहे की, “आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर, आम्ही, आदिनाथ म. कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन करत आहोत.
म्हणूनच, आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा (Privacy) आदर करावा, अशी आमची नम्र विनंती आहे. या विषयावर आमचे हेच एकमेव वक्तव्य असेल आणि यापुढे आम्ही यावर कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नाही. तुमचं प्रेम आणि समजूतदारपणाबद्दल मनापासून धन्यवाद. आदिनाथ आणि ऊर्मिला
आदिनाथ आणि उर्मिला यांच्या घटस्फोटाबाबत माहिती मिळताच अनेकांना धक्का बसला. गेले काही दिवस हे जोडपे वेगळे राहत असल्याची चर्चा होती. आदिनाथच्या कुठल्याही सिनेमाच्या प्रमोशनला उर्मिला दिसायची नाही त्यामुळे अनेकांना त्यांच्या नात्याबाबत संशय आलेला. पण दोघांपैकी कोणाकडूनही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. पण आता त्यांनी ही बाब उघडपणे जाहीर केली आहे.
उर्मिला आणि आदिनाथ यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाल्यास महेश कोठारे यांच्या काही वर्षांपूर्वी गाजलेल्या शुभमंगल सावधान या सिनेमात उर्मिला प्रमुख भूमिकेत दिसली होती. तर आदिनाथ त्याच्या करिअरची सुरुवात करत होता. तो या सिनेमात महेश कोठारे यांना असिस्ट करत होता. त्यावेळेस या दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही काळाने त्यांनी लग्न केले. त्यांना एक मुलगी देखील झाली जिचं नाव जिजा असं ठेवले. पूर्वी बरेचदा हे जोडपे एकत्र दिसून यायचे. लेकीचा बारसा सुद्धा अगदी जंगी केला होता. पण नंतर नंतर त्यांचे एकत्र दिसणे कमी झाले त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा सुद्धा हिरमोड झाला. अशातच आता ही बातमी समोर आल्यामुळे अनेक आणि नाराजी व्यक्त केली आहे.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा