अदानींसाठी सरकार नियम बदलणार?
देश-विदेशातील ऊर्जा ते डिफेन्स अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत या समूहाला यामुळे विमान कंपनी सुरू करण्यास आणि विमान वाहतूक क्षेत्रात विस्तार करण्यास मदत होऊ शकेल. अदानी ग्रुप सध्या या क्षेत्रात आधीच 8 विमानतळांचे संचालन करतो आणि पायलट प्रशिक्षण, विमान दुरुस्ती व ग्राउंड हँडलिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये मजबूत होल्डिंग आहे. सध्या मुंबई विमानतळात अदानीची 74% हिस्सेदारी, तर दिल्ली विमानतळात जीएमआर एअरपोर्ट्सची 74% हिस्सेदारी आहे.
Pakistan Cash Crunch Crisis: इराणसोबत चर्चा घडवून दिली आता 96000 कोटी द्या! पाकिस्तानने अमेरिकेसमोर पुन्हा हात पसरवले
अशा परिस्थितीत, सरकार सध्याच्या विमानतळ खाजगीकरण करारात दुरुस्तीच्या उद्देशाने कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. म्हणजे सगळं सुरळीत पार पडल्यास अदानी एअरलाइन्सची विमानेही आकाशात उड्डाण करताना दिसतील. अदानी समूह सध्या आधीच भारतातील सर्वात मोठा खाजगी बंदर संचालक, दुसरा सर्वात मोठा सिमेंट उत्पादक आणि ऊर्जा क्षेत्रातील (वीज, गॅस, सौर) प्रमुख घटक आहे. त्याचवेळी, आता विमान वाहतूक क्षेत्रात एन्ट्री घेतल्यास समूहाचा प्रभाव आणखी वाढेल, ज्यामुळे वाढत्या बाजारशक्तीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.
मोदी सरकारचा नेमका विचार काय?
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार केंद्रातील मोदी सरकार सध्या अशा धोरणावर काम करत आहे जेणेकरून विमानतळ चालकांना स्वतःच्या विमान कंपन्या सुरू करण्याची संधी मिळू शकेल. या निर्णयामुळे अदानी ग्रुप आणि GMR एअरपोर्ट्स यासारख्या मोठ्या कंपन्यांना स्वतःच्या विमान कंपन्या लाँच करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल.
विमानतळ संचालकांसाठी नियम काय
नागरी हवाई वाहतूक मंत्रालय सध्याच्या नियमात पूर्वलक्षी बदल करण्याच्या कायदेशीर वैधतेबाबत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचे मत मागवत असल्याचे ईटीने आपल्या अहवालात सांगितले. 2006 मध्ये दिल्ली आणि मुंबई विमानतळांच्या खाजगीकरणादरम्यान नियम लागू केला गेला होता, ज्यामध्ये कोणताही बदल करण्यासाठी मंत्रिमंडळ मंजुरीची गरज असेल.
Trump Tariff: डोनाल्ड ट्रम्प यांची सटकली; जेनेरिक औषध टॅरिफबाबत मोठी घोषणा, भारतीय फार्मा कंपन्यांची धाकधूक वाढली
केंद्र सरकारचा विमान वाहतूक क्षेत्रात इंडिगो आणि एअर इंडियाचे वर्चस्व मोडून काढण्याचा उद्देश असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्या केवळ या 2 कंपन्यांचा भारतीय विमान वाहतूक बाजारात अंदाजे 90% हिस्सा असून गेल्या वर्षी इंडिगोने डिसेंबरमध्येहजारो उड्डाणे रद्द केलेली ज्यामुळे मोठ्या संख्येत प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता, त्यामुळे आता सरकार भविष्यात ही परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करेल.
गेल्या वर्षी गौतम अदानींचा मुलगा, जीत अदानी, ने विमान वाहतूक व्यवसायात रस नसल्याचे सांगत समूहाच्या भांडवली शिस्तीशी विसंगत असल्याचे म्हटले होते. मात्र, विचारसरणीत बदल होत असल्याचे आणि हा बदल एम्ब्रेअरच्या सहकार्याने विमाने विकसित करण्याच्या योजनांशी थेट संबंधित असल्याचे मानले जात आहे.
त्याचवेळी, कोणतेही निर्बंध टाळता येतील अशी तरतूद करण्याबाबत सरकारला सूचना केली गेल्याचे अधिकाऱ्याने पुढे सांगितले, पण सध्या समूहामध्ये विमान कंपनीचा ताबा घेण्याबद्दल कोणतीही ठोस चर्चा सुरू नसल्याचे पुढे स्पष्ट केले गेले.

