Headlines

Yes Bank Co-Founder Rana Kapoor Downfall; व्यावसायिक घराण्यांना कर्ज देऊन बँकेलाच कर्जदार बनवणारा ‘राणा’, कर्जाच्या बदल्यात लाच घेऊन जमवली 4500 कोटींची माया

Billionaire Downfall Story: राणा कपूर येस बँकेचे संस्थापक, माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ होते, पण मग तुरुंगच त्यांचे दुसरे घर बनले. आपल्या पदाचा गैरवापर करून कुटुंबाला फायदा मिळवून दिल्याबद्दल आणि बँकेला मोठे नुकसान पोहोचवल्याबद्दल राणा कपूरवर खटले दाखल केले गेले असून एकेकाळी येस बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती.

Yes Bank Co-founder Rana Kapoor Downfall Story
येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर
Banking Fraud: येस बँक प्रकरण उघडकीस आल्यावर अख्खी बँकिंग प्रणाली हादरली. एकेकाळी येस बँकेचे सर्वेवा राणा कपूरवर पदाचा गैरवापर करून कुटुंबाला फायदा पोहोचवला आणि बँकेचे मोठे नुकसान केल्याचा आरोप असून तब्बल चार वर्षानंतर तुरुंगातून जामिनावर बाहेर आहेत. राणा कपूरच्या कारस्थानमुळे येस बँक एकेकाळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली. ईडीच्या माहितीनुसार राणा कपूरच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात येस बँकेने अंदाजे 30000 कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली, त्यापैकी 20000 कोटी एनपीए घोषित केले गेले.

कुटुंबाच्या नावावर 4500 कोटींची संपत्ती

कुटुंबाच्या नावावर 4500 कोटींची संपत्ती

एकट्या भारतातच राणा कपूरच्या कुटुंबीयांच्या नावावर 4500 कोटींच्या मालमत्तेचे पुरावे सापडले आहेत. याशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्समध्येही कपूर कुटुंबाच्या नावावर अनेक मालमत्ता आढळून आल्या आहेत. तसेच DHFL ला दिलेल्या 4450 कोटींच्या बदल्यात 600 कोटींची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे.

राणा कपूर कोण?

राणा कपूर कोण?

9 सप्टेंबर 1957 रोजी दिल्लीत जन्म आणि लहानाचे मोठे झालेले राणा कपूर एकेकाळी भारतातील सर्वात श्रीमंत बँकर म्हणून ओळखले जायचे. राणा कपूरला AIMA कडून मानद फेलोशिप, न्यू जर्सी येथील रटगर्स विद्यापीठाकडून राष्ट्रपती पदक आणि जी. बी. पंत कृषी विद्यापीठाकडून मानद फेलोशिप मिळाली.

बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द

बँकिंग क्षेत्रातील कारकीर्द

एमबीए पूर्ण केल्यानंतर 1980 मध्ये राणा कपूर बँक ऑफ अमेरिकेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले, जिथं त्यांनी 16 वर्ष काम केले. 1996 मध्ये ANZ ग्रिंडलेज इन्व्हेस्टमेंट बँक (एएनझेडआयबी) मध्ये महाव्यवस्थापक आणि कंट्री हेड म्हणून रुजू झाले, तर 2004 मध्ये राणा यांनी नातेवाईक अशोक कपूरसोबत येस बँकेची सह-स्थापना केली.

मुंबई हल्ल्यानंतर सुरू झाला वाद

मुंबई हल्ल्यानंतर सुरू झाला वाद

26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशहतवाडी हल्ल्यात राणा कपूरचे येस बँकेचे सह-संस्थापक अशोक कपूर शाहिद झाले. यानंतर बँकेच्या मालकी हक्कावरून अशोकच्या पत्नी मधू आणि राणा यांच्यात तीव्र संघर्ष सुरू झाला. मधू यांना आपल्या मुलीसाठी बँकेच्या संचालक मंडळात स्थान हवं होतं, पण या वादामुळे बँकेचा पाया हळूहळू पोखरला गेला, ज्यामुळे बँक बिकट परिस्थितीत सापडली.

कर्ज वाटप बनले गळ्याचा फास

कर्ज वाटप बनले गळ्याचा फास

राणा कपूरने कर्ज वितरण आणि कर्जाची वसुली करण्यासाठी वेगळा मार्ग निवडला. येस बँकेने राणा कपूरच्या वैयक्तिक ओळखीच्या आधारावर व्यक्तींना कर्ज दिले. यामध्ये अनिल अंबानी ग्रुप, आयएल अँड एफएस, सीजी पॉवर, एस्सार पॉवर, रेडियस डेव्हलपर्स आणि मिनिस्टर ग्रुप यांसारख्या व्यावसायिक घराण्यांचा समावेश होता. पण हेच व्यावसायिक कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरले, तेव्हा बँकेला मोठा धक्का बसला. 2017 मध्ये बँकेने 6,355 कोटींची कर्जे NPA किंवा बुडीत म्हणून वर्गीकृत केली, ज्यामुळे आरबीआयने बँकेवरील आपली पकड अधिक घट्ट केली.

राणा कपूरवर अनियमिततेचे आरोप

राणा कपूरवर अनियमिततेचे आरोप

2018 मध्ये रिझर्व्ह बँकेने राणा कपूरवर कर्ज आणि ताळेबंदात अनियमितता केल्याचा आरोप केला व त्यांना बँकेचं अध्यक्षपदावरून जबरदस्तीने हटवले. बँकेच्या इतिहासात एखाद्या अध्यक्षाला अशा प्रकारे पदावरून हटवण्याची ही पहिलीच वेळ होती.

शेअर्स विकायची नामूशक्ती ओढवली

शेअर्स विकायची नामूशक्ती ओढवली

राणा कपूरना कधीच Yes बँकेचे शेअर्स विकायचे नव्हते. त्यांनी ट्विट केलेले की, “All good. I love Yes Bank. I will never sell my shares.” मात्र, ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांचा आणि त्यांच्या समूहाचा हिस्सा 4.72% पर्यंत घसरला. 3 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ समूह अध्यक्ष रजत मोंगा यांनी राजीनामा दिला.

रिझर्व्ह बँकेची राणा कपूरवर कारवाई

रिझर्व्ह बँकेची राणा कपूरवर कारवाई
प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा