jofra archer on vaibhav sooryavanshi : वैभव सूर्यवंशी याने मूर्ती लहान आणि कीर्ती महान हे दाखवून दिले आहे. दोन सामन्यता त्याने आक्रमक सुरूवात केली पण तो मोठ्या खेळीत वाढवू शकला नाही. दोन सामन्यात तो फेल गेला त्याची क्षमता काय आहे हे जोफ्रा आर्चरला माहिती आहे. त्यामुळेच आऊठ करूनही तो वैभवबाबत काय म्हणाला जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. पहिला सामना पावसाने वाया गेला पण त्यानंतरचे दोन्ही सामन्यात इंग्लंडने भारताला सहज पराभूत केले आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यामध्ये वर्ल्ड कप विजेत्या भारताला ७६ धावांवर ऑल आऊठ करत इतिहासामधील सर्वात मोठा पराभव केला. या सामन्यामध्ये सर्व भारतीय चाहत्यांचा लाडका खेळाडू असलेल्या वैभ सूर्यवंशीसुद्धा खेळायला होता पण वैभव पुन्हा एकदा आक्रमक सुरूवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
वैभवच्या जगासमोर आलेली पडती बाजू म्हणजे त्याला इंग्लंडचे खेळाडू बाऊन्सरचा मारा करत आहेत. जोफ्रा आर्चर याने शॉर्ट बॉलवर त्याला आऊट केले. पहिल्या म्हणजे पदार्पण सामन्यात वैभवने जोफ्राला खणखणीत षटकार मारत दमदार सुरूवात केली होती. दुसऱ्याही सामन्यात वैभवने षटकार मारला पण जोफ्रानेच त्याला आऊट केले. आता चौथ्या सामन्यात दोघे आमने सामने येतील कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आर्चरलाही माहित आहे की वैभव अपयशामुळे खचून जाणारा खेळाडू नाह, म्हणूनच तो वैभवची विकेट घेतल्यावर हवेत गेला नाही काय म्हणाला जाणून घ्या. IND vs ENG : भारताचा सलग चौथा पराभव, कोच गंभीर म्हणतोय हरलो पण त्या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल असणार, नेमका कोण?
जोफ्रा आर्चर काय म्हणाला?
मला वाटतं आता बरोबरी झाली आहे पण दोन सामने बाकी असून निकाल कोणाच्याही बाजूने लागू शकतो. जो सर्वोत्तम कामगिरीत सरस ठरेल तोच जिंकेल, असं जोफ्रा आर्चर म्हणाला. आम्हाला माहिती होतं की २०० धावांचे आव्हान चेज करू शकणार नाही, कारण आयपीएलमध्ये २०० धावा माफक नसतात पण इथल्या पिचवर गुड लेंथवर मारा केल्यास गोलंदाजांना मदत होते, असंही आर्चरने म्हटलं आहे. IND vs ENG 3rd T20 : भारताचा इतिहासातील सर्वात मोठा पराभव, 76 धावांवर ऑल आऊट; वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल, सामना कुठे फिरला? दरम्यान, भारताने दोन्ही सामन्यामध्ये निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या सामन्यात रवी बिश्नोईची एक ओव्हर महागात पडली होती. तिसऱ्या सामन्यात त्याला बाहेर केले गेले. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव याची निवड करण्यात आली होती. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा आणि भारताकडून दुसरा टी-२० सामना खेळताना प्रिन्सने जोस बटलर आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांची विकेट घेतली. परंतु या सामन्यात इंग्लंडने स्पिनर्सला लक्ष्य करत आक्रमक फलंदाजी करत धावा वसूल केल्या.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा