Headlines

LPG गॅस सिलिंडरला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा? सोपी ऑनलाईन पद्धत। Maharashtra Times


LPG गॅस बुक करताना मोबाईल नंबर लिंक नसल्याचा मेसेज येत असेल तर आता काळजी करू नका. गॅस सबसिडी मिळवण्यासाठी आणि डिलिव्हरी OTP साठी मोबाईल नंबर अपडेट असणे गरजेचे आहे. ग्राहक कोणत्याही एजन्सीमध्ये न जाता घरबसल्या अधिकृत पोर्टल किंवा व्हॉट्सॲपद्वारे अवघ्या काही मिनिटांत आपला नंबर कसा लिंक करू शकतात, याची सोपी टेक ट्रिक जाणून घ्या.

LPG Cylinder । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
डिजिटल गॅस बुकिंगदरम्यान अनेक ग्राहकांना मोबाईल नंबर लिंक नसल्याचा एरर मेसेज दिसतोय. यामुळे बुकिंग ट्रॅक करणे आणि गॅस सबसिडी मिळवणे कठीण होते. हा तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी गॅस कंपन्यांनी ऑनलाईन सुविधा दिली आहे. ग्राहक घरबसल्या मोबाईलवरूनच आपला नंबर कसा अपडेट किंवा चेंज करू शकतात, याचे सविस्तर मार्गदर्शन खालीलप्रमाणे आहे.

तुम्हालाही गॅस बुक करताना मोबाईल नंबर लिंक नसल्याचा एरर असा मेसेज येत असेल, तर गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची अजिबात गरज नाही. ग्राहक घरबसल्या आपल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करू शकतात.

मोबाईल नंबर लिंक असणे का आवश्यक आहे?

  1. LPG सिलिंडरच्या पारदर्शक वितरणासाठी गॅस कंपन्यांनी ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ (DAC) अनिवार्य केला आहे. गॅस सिलिंडर घरी आल्यावर डिलिव्हरी बॉयला हा OTP द्यावा लागतो. जर मोबाईल नंबर लिंक नसेल, तर हा OTP येत नाही आणि गॅस मिळण्यात अडचण होते. याशिवाय, गॅसची सबसिडी थेट बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज मिळवण्यासाठी आणि व्हॉट्सॲपवरून बुकिंग करण्यासाठी नंबर रजिस्टर असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  2. घरबसल्या मोबाईल नंबर लिंक करण्याची ऑनलाईन पद्धत
  3. Indane, HP Gas किंवा Bharat Gas या कोणत्याही कंपनीचे ग्राहक खालील स्टेप्स फॉलो करून आपला नंबर अपडेट करू शकतात:

1. mylpg.in पोर्टलचा वापर

  • सर्वप्रथम मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर www.mylpg.in ही अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • होम पेजवर उजव्या बाजूला तिन्ही कंपन्यांच्या सिलिंडरचे फोटो दिसतील. तुमच्या कंपनीच्या सिलिंडरवर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन झाल्यावर तिथल्या मेन्यूमधून ‘Update Mobile Number’ किंवा ‘Quick Update’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी किंवा Consumer Number आणि गॅस एजन्सीचे नाव टाका.
  • यानंतर तुमचा नवीन मोबाईल नंबर टाईप करून ‘Submit’ करा. तुमच्या नंबरवर एक OTP येईल.
  • तो OTP स्क्रीनवर टाकून सबमिट करताच तुमचा नवीन मोबाईल नंबर गॅस खात्याशी लिंक होईल.

2. व्हॉट्सॲप आणि SMS द्वारे सुलभ पर्याय

  • Indane Gas: जर तुमचे बुकिंग हॉटलाईनवर होत नसेल, तर तुम्ही तुमच्या नवीन नंबरवरून IOC <17 अंकी ग्राहक आयडी> असा SMS 7718955555 या नंबरवर पाठवून नोंदणी करू शकता.
  • Bharat Gas: भारत गॅसचे ग्राहक 1800224344 या अधिकृत नंबरवर ‘Hi’ लिहून व्हॉट्सॲप मेसेज करू शकतात आणि तिथून नंबर बदलण्याचा पर्याय निवडू शकतात.
  • HP Gas: ग्राहक आपल्या मोबाईलमध्ये ‘HP Pay’ ॲप डाऊनलोड करून ‘Profile’ सेक्शनमध्ये जाऊन नंबर अपडेट करू शकतात.

ऑनलाईन लिंक न झाल्यास काय करावे?

काही वेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा जुना डेटा मॅच न झाल्यामुळे ऑनलाईन नंबर अपडेट होत नाही. अशा वेळी ग्राहकांनी आपल्या Gas Agency कडे जावे. तिथून एक छोटा KYC फॉर्म भरून आधार कार्डची प्रत जोडल्यास अवघ्या 24 तासांत एजन्सीकडून नवीन नंबर सिस्टममध्ये अपडेट केला जातो.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा