Headlines

France Heatwave: फ्रान्समध्ये उष्णतेमुळे ‘रेड अलर्ट’; पाच दिवसांमध्ये 40 जणांनी गमावला जीव – red alert issued in france due to rising heat 40 deaths in the last 5 days


France Heatwave: उष्णतेच्या त्या भयंकर लाटेनंतर फ्रान्समध्ये उष्णता निरीक्षण इशारा प्रणाली सुरू करण्यात आली होती. युरोपमध्ये तापमानवाढ झाली आहे.

europe heat wave
फ्रान्समध्ये उष्णतेमुळे रेड अलर्ट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, पॅरिस : फ्रान्समध्ये वाढत्या उष्णतेमुळे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. फ्रान्सच्या हवामान सेवा विभागाने देशातील ५४ विभागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. फ्रान्समधील नागरिक तीव्र उकाड्याचा सामना करीत असून, गेल्या पाच दिवसांत ४० जणांचा मृत्यू ओढवला आहे. यापैकी बहुतांश नागरिक तरुण होते.

संपूर्ण फ्रान्समध्ये प्रखर सूर्यप्रकाश कायम असून, देशभर असह्य आणि थकवणाऱ्या उष्णतेचा अनुभव येत आहे. शाळा, रेल्वे आणि क्रीडा स्पर्धांवर उष्णतेमुळे परिणाम होत आहे. उष्णतेची ही परिस्थिती आठवड्याच्या अखेरपर्यंत कायम राहणार असून अनेक शहरांमध्ये दिवसाचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Maharashtra TimesHormuz Standoff: इराण हट्टाला पेटूनच, समुद्रात हॉटलाइन उभारणार; म्हणाले – होर्मुझवर फक्त आमचंच नियंत्रण, सामुद्रधुनी पुन्हा पूर्वीसारखी होणार नाही!
वर्षभरात आणखी विक्रमी तापमान अपेक्षित आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. ऑगस्ट २००३ मध्ये आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेशी या परिस्थितीची तुलना केली जात आहे. त्यावेळी उच्च तापमानामुळे सुमारे १५ हजार मृत्यू ओढवले होते. त्यामध्ये वृद्धाश्रमात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

Maharashtra TimesRomanch Mahajan : घोडागाडीतून आई पडली, 18 वर्षांच्या लेकाचा जीव घाबरा, आईला वाचवण्याच्या नादात तरुणाने जीव गमावला, महाजन कुटुंबावर शोककळा
ब्रिटनमध्येही उष्णतेची लाट
ब्रिटनमध्येही उष्णतेची लाट आली असून बुधवार आणि गुरुवारी तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण इंग्लंडमध्ये सुमारे ३७ अंश सेल्सिअस तापमानाची अपेक्षा आहे, तर आग्नेय वेल्समध्ये ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचू शकते, असे सांगण्यात आले. शुक्रवारपर्यंत तापमान कमी होईल, असा अंदाज आहे.

नेपाळमध्ये ‘बर्ड फ्लू’
काठमांडू :
नेपाळमध्ये ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशातील अकरापैकी सात जिल्ह्यांमध्ये बाधा झाल्याचे आढळून आले आहे. अन्य चार जिल्ह्यंमध्ये संसर्ग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. बर्ड फ्लू’ला रोखण्यासाठी साडेपाच लाखांपेक्षा अधिक कोंबड्या व दहा लाख अंडी नष्ट केली आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा