प्रशांत महासागरात ‘एल निनो’ चा प्रभाव सातत्याने वाढत असून हवामान अभ्यासकांनी अत्यंत चिंताजनक इशारा दिला आहे. वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजेच 2026 च्या अखेरपर्यंत हा हवामान बदल अतिशय तीव्र आणि शक्तिशाली होण्याची 90 टक्क्यांपेक्षा जास्त शक्यता वर्तवण्यात आली असून, याचे जागतिक हवामानावर गंभीर परिणाम होऊ शकतात. याविषयीची सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया.

सविस्तर माहिती अशी आहे की, प्रशांत महासागरामध्ये एक अत्यंत शक्तिशाली ‘एल निनो’ वादळ सातत्याने आकारास येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 2026 च्या उत्तरार्धात आणि 2027 च्या सुरुवातीला हा एल निनो अत्यंत तीव्र हवामान बदलामध्ये (Very strong climate event) रुपांतरित होण्याची 90 टक्क्यांपेक्षा जास्त शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ (NOAA) च्या ताज्या रिपोर्टनुसार, गेल्या एका महिन्यात पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान सातत्याने वाढत आहे, जे एल निनो अधिक मजबूत आणि शक्तिशाली होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
वैज्ञानिक संशोधनानुसार, विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या (Equatorial Pacific) काही भागांमध्ये समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सध्या सामान्यपेक्षा तब्बल 2 अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले आहे. हो. धक्कादायक बाब अशी आहे की, हे गरम पाणी केवळ पृष्ठभागावर नसून समुद्राच्या खोलवर पसरलेले आहे, ज्यामुळे येत्या काही महिन्यात या एल निनो हवामान पॅटर्नला अधिक तीव्र होण्यासाठी अतिरिक्त इंधन (बळ) मिळत आहे.
या बातमीचा (नकाशाचा फोटो) फोटो कसा समजून घ्यायचा?
- नकाशातील गडद लाल, तपकिरी पट्टा: प्रशांत महासागराच्या (Pacific Ocean) मध्य आणि पूर्व भागात, विशेषतः विषुववृत्ताजवळ (Equatorial Pacific), समुद्राच्या पाण्याचे तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त वाढले आहे. हाच मजबूत होत चाललेल्या शक्तीशाली एल निनोचा सर्वात मोठा पुरावा आहे.
- निळा रंग: हा भाग तापमान सामान्यपेक्षा कमी (थंड) असल्याचे दाखवत आहे.
- पिवळा आणि फिकट लाल रंग: हा भाग तापमान सामान्यपेक्षा थोडे जास्त असल्याचे दाखवत आहे.
प्रशांत महासागरातील हवामानाच्या स्थितीवर ‘एल निनो’चा स्पष्ट प्रभाव आता दिसू लागला आहे. मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरामध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, तर दुसरीकडे इंडोनेशियासारख्या देशांमध्ये सामान्यपेक्षा अत्यंत कोरडे (दुष्काळसदृश) वातावरण निर्माण झाले आहे. यासोबतच, उष्णकटिबंधीय (tropics) भागातील वाऱ्यांच्या दिशेमध्ये आणि वेगात वेगाने बदल होत आहेत, जे एल निनो अधिक तीव्र होत असल्याचे प्रमुख लक्षण मानले जाते. NOAA आणि आंतरराष्ट्रीय हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांच्या ‘क्लायमेट मॉडेल्स’ नुसार, हा एल निनो 2026 च्या अखेरपर्यंत सातत्याने अधिक शक्तिशाली होत राहण्याची शक्यता आहे.
हा एल निनो एक ऐतिहासिक घटना ठरू शकतो
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, 69 टक्के शक्यता अशी आहे की चालू असलेला हा एल निनो एक ऐतिहासिक घटना ठरू शकतो. 1950 मध्ये आधुनिक हवामान नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून, आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या काही सर्वात तीव्र आणि शक्तिशाली एल निनोच्या विक्रमांशी हा बरोबरी करू शकतो किंवा त्यांनाही मागे टाकू शकतो. जर असे झाले, तर हा एल निनो जगातील सर्वात मोठ्या आणि धोकादायक हवामान बदलांच्या यादीत सामील होईल, ज्याचे जगभरातील हवामान पद्धतींवर अत्यंत गंभीर आणि दूरगामी परिणाम झाले आहेत.

