Gadchiroli News : सासरवाडीला सुट्टीसाठी सहपरिवार गेलेले, शेतात गेला अन् अचानक आली फिट… अभियंत्यासोबत वाईट घडलं – engineer who went on vacation in gadchiroli died after falling into a drain
Gadchiroli News : सासरवाडीला सुट्टीसाठी सहपरिवार गेलेले, शेतात गेला अन् अचानक आली फिट… अभियंत्यासोबत वाईट घडलं – engineer who went on vacation in gadchiroli died after falling into a drain
Gadchiroli Accident : News गडचिरोली येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुट्टीसाठी गेलेल्या अभियंत्याचा मृत्यू झाला आहे. नाल्यावर गेला तिकडेच त्याला फिट आली अन् नाल्यात पडला. सासरवाडीमध्ये मुलांना घेऊन आलेल्या अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश गुंडेट्टीवार, गडचिरोली : शेतालगत असलेल्या नाल्यातील पाण्यात बुडून ३७ वर्षीय सहाय्यक अभियंत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (८ ऑगस्ट) रोजी रात्रीच्या सुमारास मुलचेरा तालुक्यात उघडकीस आली. दलसु कटिया नरोटे (३७) असे त्याचे नाव असून सध्या दलसू हा नांदेड तालुक्यातील मुखेड येथे महावितरण विभागात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत होता.
दलसू हा काही दिवस सुट्ट्या घेऊन सहपरिवार गावाकडे आला होता. ७ ऑगस्ट रोजी दलसू हा पत्नी आणि दोन मुलांना घेऊन (सासुरवाडी) पुल्लिगुडम (ता. मुलचेरा) येथे गेला होता. शेतात रोवणीचे काम सुरू असल्याने शुक्रवारी (८ ऑगस्ट) रोजी तो शेतात गेला होता. दरम्यान इकडे रोवणी सुरू असताना तो लगतच्या नाल्यावर गेला. त्याला फिट (मिर्गी) आल्याने पाण्यात पडला. बराच वेळ पासून दलसु न परतल्याने घरच्यांनी नाला गाठले. त्या ठिकाणी दलसु नाल्याच्या पाण्यात पडल्याचे दिसून आले. लगेच कुटुंबीयांनी गावकऱ्यांच्या मदतीने दलसूला दुचाकीवर घेऊन गाव गाठले. खाजगी वाहनाने एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात नेले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मात्र, रात्री उशिर झाल्याने शवविच्छेदन करता आले नाही. आज शनिवारी (९ ऑगस्ट) रोजी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. Gadchiroli News: हिरो कंपनीच्या शोरुमची इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू, तिघे जखमी; गडचिरोलीत खळबळ दलसु कटिया नरोटे हा एटापल्ली तालुक्यातील कारमपल्ली येथील रहिवासी असून २०१४ मध्ये त्याने महावितरण विभागात सहाय्यक अभियंता पदाला गवसणी घातली होती. त्याने गडचिरोली, कोल्हापूर, परभणी जिल्ह्यात सेवा दिली. आता तो नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यात कार्यरत होता. नुकतेच काही दिवस सुट्ट्या घेऊन तो गावाकडे आला होता. त्याला फिट्स आजार असून यापूर्वी देखील कार्यालयात पडल्याने सहकाऱ्यांनी वेळीच धाव घेऊन मदत केल्याची माहिती त्याची पत्नी ज्योती हिने दिली. Gadchiroli Accident : व्यायामाला गेले असताना काळाची झडप, भरधाव टिप्परने सहा जणांना चिरडलं, चार जणांचा अंत; गावात शोककळा एटापल्ली तालुक्यातील दलसू हा महावितरण विभागात सेवा देणारा पहिलाच अधिकारी होता. सुट्ट्या घेऊन स्व जिल्ह्यात येताच काळाने घाला घातला.त्याच्या पश्चात पत्नी ज्योती,वृत्त्विक आणि दर्शीत असे दोन चिमुकले आहेत. वृत्त्विक हा इयत्ता दुसरीत असून दर्शीत हा नर्सरी मध्ये शिक्षण घेत आहे.या घटनेने नरोटे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा