Gadchiroli Dhanora Niwasi Ashram School Three Students Died of Snakebite; साखरझोपेत असताना आक्रित घडलं, तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने करुण अंत; कुटुंबीयांचा आक्रोश
Gadchiroli Dhanora Niwasi Ashram School Three Students Died of Snakebite; साखरझोपेत असताना आक्रित घडलं, तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने करुण अंत; कुटुंबीयांचा आक्रोश
Gadchiroli Snake Bite Three Student Death : गडचिरोलीमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. धानोरामधील निवासी आश्रम शाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाला आहे.
धानोरा तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गडचिरोली : गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, तर तीन विद्यार्थिनी जखमी असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनी जेवणानंतर झोपलेले असताना रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, धानोरा रुग्णालयात उपचारादरम्यान इयत्ता सहावीतील आणि इयत्ता आठवीतील या दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. तर गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनीचाही मृत्यू झाला. दरम्यान, इयत्ता पाचवीतील, सहावीतील आणि इयत्ता आठवीतील या तीन विद्यार्थिनींवर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एका विद्यार्थिनीची प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
सिंधुदुर्गमधील आंबोलीमध्येही मुख्य धबधब्यावर एका पर्यटकाचा सर्पदंश झाल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाधर मरिअप्पा कोरावार (रा. विजयनगर, कर्नाटक) असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचं नाव आहे. या घटनेमुळे आंबोलीतील पर्यटकांमध्ये तसेच स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाटेतच प्राणज्योत मालवली
गंगाधर कोरावार आपल्या सहा मित्रांसोबत आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी चारच्या सुमारास आंबोलीतील मुख्य धबधब्यावर सर्व मित्र आंघोळीचा आनंद घेत असताना गंगाधर यांना अचानक विषारी सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचं समजताच मित्रांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांना तत्काळ आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र, त्यांची प्रकृती ढासळल्यानं डॉक्टरांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णवाहिकेतून सावंतवाडीला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा