Sindhudurg Vaibhav Wadi ZP School Teacher Pooja Pawar goes missing Crime News; शाळेत झेंडावंदन केलं, पण घरी परतलीच नाही; कोकणातील शिक्षिका बेपत्ता, फोन लागेना, आठ वर्षांचा लेक व्याकूळ
Sindhudurg Vaibhav Wadi ZP School Teacher Pooja Pawar goes missing Crime News; शाळेत झेंडावंदन केलं, पण घरी परतलीच नाही; कोकणातील शिक्षिका बेपत्ता, फोन लागेना, आठ वर्षांचा लेक व्याकूळ
Sindhudurg School Teacher Missing : सिंधुदुर्गामधील चव्हाणवाडीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असलेल्या पूजा पोवार एक मे रोजी सकाळी शाळेत आल्या होत्या. शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत.
पूजा पोवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी येथे 34 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आली आहे. पूजा अनिल पोवार असे बेपत्ता महिलेचे नाव असून ती व्यवसायाने शिक्षिका आहे. 1 मे रोजी शाळेत झेंडावंदन केल्यानंतर तिचा ठावठिकाणा लागत नसल्याची माहिती आहे. पतीसह तिचा आठ वर्षांचा लेक व्याकूळ झाल्याची माहिती आहे.
वैभववाडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूजा पोवार या सोनाळी येथील चव्हाणवाडीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्या एक मे रोजी सकाळी शाळेत आल्या होत्या. शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत.
आमदार नारायण कुचेंच्या लेकीच्या लग्नाला राजकीय नेत्यांची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांकडून खास शुभेच्छा
पोलिसांकडून माहिती पुरवण्याचं आवाहन
पोवार कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नाही. अखेर दोन मे रोजी तिचे पती अनिल पोवार यांनी आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलीसही तिचा शोध घेत आहेत. बेपत्ता विवाहित महिलेला 8 वर्ष वयाचा एक मुलगाही आहे. पोलिसांनी फोटो शेअर करत महिला कुठे निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षिकेचा फोन बंद
दरम्यान, वैभववाडी पोलिसांकडून महिलेला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांचा मोबाईल बंद येत आहे. वैभववाडी पोलिसांना माहिती मिळालेल्या संबंधित एका व्यक्तीचाही मोबाईल बंद येत आहे. त्यामुळे ही महिला नक्की कुणीकडे गेली आहे, हे अद्याप समजू स्पष्ट झालेले नाही. Watermelon Deaths : वैद्यकीय उपचार मिळण्यात साडेपाच तास विलंब, डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी नवी अपडेट, पोस्टमार्टममध्ये काय? वैभववाडी पोलिसांना या संदर्भात काही वेगळी माहिती मिळाली असून या महिलेचे नातेवाईक व कुटुंबीयांना यासंदर्भात वैभववाडी पोलिसांनी संपर्क साधला आहे. या सगळ्या घटनेची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास वैभववाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सोनाळकर करीत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा