Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हासोबत एकदा भयानक प्रसंग घडलेला. याबद्दल तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अशातच आता अभिनेत्रीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. २०२५ मध्ये, सोनाक्षी सिन्हा ‘निकिता रॉय’ नावाच्या एका हॉरर-मिस्ट्री चित्रपटात दिसली. या सिनेमात सस्पेन्स होता. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीनं तिच्यासोबत घडलेला भयानक प्रकार सांगितला होता.
सोनाक्षी सिन्हानं सांगितला भयानक अनुभव
घडलेल्या घटनेबद्दल सांगताना सोनाक्षीनं सांगितलेलं की, ती झोपलेली आणि पहाटेचे चार वाजले होते. सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, ‘माझा आधी या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण एक दिवस माझ्यासोबत माझ्याच घरात काहीतरी विचित्र घटना घडली आणि त्यामुळे माझ्या विश्वासाला थोडा धक्का बसला. पण त्या दिवसानंतर मात्र असं काहीही घडलेलं नाही. मला वाटतं कदाचित ते एक स्वप्न असावं. ते स्वप्न होतं की, खरंच असं घडलं हे मला माहित नाही. कोणीतरी माझ्यावर वजन टाकतंय आणि मला उचलून घेत आहे, असं जाणवलं. मी इतकी घाबरले होते की, मी माझे डोळे बंद केले. तिथे कोण आहे की नाही हे पाहण्यासाठी डोळे उघडण्याची हिंमतही झाली नाही. सकाळ होईपर्यंत आणि उजेड दिसेपर्यंत मी डोळे उघडलेच नाहीत.’
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
‘दुसऱ्या दिवशी पुन्हा मी रात्री घरी आले. दरवाजा उघडला आणि सर्वात आधी आत डोकावून खूप मोठ्यानं म्हणाले, काल रात्री जे कोणी आलं होतं, पुन्हा माझ्यासोबत असं करू नका, मी खूप घाबरले होते. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते माझ्या स्वप्नात येऊन बोला.’ असं सोनाक्षीनं शेवटी सांगितलं. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनाक्षी सिन्हा बोलत होती.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा