नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे महावितरणच्या चुकीमुळे एका खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला. वीज बिल भरलेले असतानाही हा प्रकार घडला. रुग्णांना रस्त्यावर उपचार द्यावे लागले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नंदुरबार , महेश पाटील : शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात महावितरणच्या गंभीर निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या मृत्यू झाला असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वीज बिल भरलेले असतानाही एका खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ऑक्सिजनवर असलेल्या एका वृद्ध आजोबांची मृत्यू झाला आहे. अनेक रुग्णांना अक्षरशः रस्त्यावर उपचार द्यावे लागल्याची संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
म्हसावद येथील खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा महावितरणने चुकून दुसऱ्याच्या ऐवजी कापल्याचा आरोप करण्यात येत आहे. वीज खंडित झाल्यामुळे रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणा ठप्प झाली आणि ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या आजोबांना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यात वीज वितरण कंपनीने बुधवारी सकाळी ११ वाजता संबंधित रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला. त्याचवेळी रुग्णालयात इस्लामुद्दीन नझरुद्दीन लोहार (रा. म्हसावद) यांच्यावर उपचार सुरू होता. रात्रभर सुरळीत ऑक्सिजन पुरवठा त्यांना मिळाला नसल्याने गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. Nandurbar Crime : मुलाच्या विजयी मिरवणुकीत राडा, नंतर विरोधकाच्या घरी जाऊन मारहाण; शिंदे सेनेच्या माजी आमदाराला अटक या घटनेमुळे मयताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे वीज नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनाला रुग्णांना उघड्यावर उपचार देण्याची वेळ आली. काही रुग्णांना तातडीने शहादा येथे हलवण्यात आले, तर काही रुग्णांवर सध्या दुसऱ्यांकडून वीजपुरवठा घेऊन उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे म्हसावद ग्रामीण रुग्णालयाची इमारत सध्या बांधकामात असल्याने हे रुग्णालय राणीपूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. परिणामी म्हसावद परिसरातील जवळपास ५० किलोमीटरच्या परिसरात एकही शासकीय रुग्णालय उपलब्ध नसल्याने नागरिकांना खाजगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत बेजबाबदार असून रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणारी असल्याचा आरोप होत आहे.
वीज बिल भरूनही आमच्या रुग्णालयाचा वीजपुरवठा कापण्यात आला. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना मोठा धोका निर्माण झाला. वीज नसल्यामुळे आम्हाला रुग्णांना रस्त्यावर उपचार द्यावे लागले. हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचं डॉक्टर श्रीराम पाटील यांनी म्हटलं आहे. Nandurbar Crime : 29 वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं, पती आणि प्रेयसीवर गुन्हा, भाग्यश्रीने वारंवार समजावूनही… महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही वीजपुरवठा सुरळीत न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा