Headlines

Narahari Jirwal Reaction on Pune Manjari Adivasi Student Movement; नरहरी झिरवाळांना आंदोलनाची चेष्टा भोवली; ‘खाऊन-पिऊन लढा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी दिलं जशास तसं उत्तर, आंदोलक तरुण काय म्हणाले?


Adivasi Andolan Pune Protest : पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

Narahari Jirwal Reaction on Pune Manjari Adivasi Student Movement
पुणे आंदोलन नरहरी झिरवाळ(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी भागात उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा दोन आठवड्यांनंतरही सुरूच आहे. सलग 14 दिवस अन्नत्याग केल्यानं अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असली, तरी ‘जोपर्यंत मागण्या मान्य झाल्याचं अधिकृत लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही’, असा ठाम निर्धार या तरुणांनी व्यक्त केला आहे. आज 15व्या दिवशी देखील या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे.

‘ठोस निर्णयाचा कागद द्या’

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेर प्रशासकीय हालचालींना वेग आला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांच्या 15 प्रतिनिधींसोबत रात्री तब्बल पाच तास सविस्तर बैठक घेतली. तांत्रिक अडचणींवर मात करून योग्य तोडगा काढण्यासाठी मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे दोन दिवसांचा अवधी मागितला आणि उपोषण स्थगित करण्याचं आवाहन केलं. मात्र, ‘केवळ तोंडी शब्दांवर विसंबून न राहता ठोस निर्णयाचा कागद हातात पडल्याशिवाय आंदोलन संपणार नाही’, असा पवित्रा विद्यार्थी प्रतिनिधींनी घेतला आहे.

आंदोलनाची चेष्टा केल्याचा प्रकार

रात्री बैठक संपल्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि नरहरी झिरवळ हे मांजरी येथील विद्यार्थ्यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी पोहोचले होते. यावेळी बोलताना झिरवळ यांनी आपल्या जुन्या आंदोलनांचे दाखले देत विद्यार्थ्यांना चक्क ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा, आम्हीसुद्धा पूर्वी लपून-छपून खायचो’, असा अजब सल्ला देत विद्यार्थी आंदोलनाची एकप्रकारे चेष्टा केल्याचा संतापजनक प्रकार घडला.

‘झिरवळ साहेबांना प्रत्येक गोष्टीत चेष्टा करायची सवय’

या सल्ल्यावर आंदोलनस्थळी तीव्र नाराजी पसरली. विद्यार्थ्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता झिरवळ यांना थेट जागेवरच सुनावलं, ‘आम्ही खाऊन-पिऊन आंदोलन केलं असतं, तर आज तुम्हाला इथे येण्याची गरजच पडली नसती. झिरवळ साहेबांना प्रत्येक गोष्टीत चेष्टा करायची सवय आहे, पण आमच्या जीवावर बेतलेल्या या संघर्षाची अशी थट्टा करू नका’, असं विद्यार्थी म्हणाले.

बैठक अखेर निष्फळ ठरली

दरम्यान, विद्यार्थी प्रतिनिधीसोबत चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री अशोक उईके म्हणाले, ‘या विभागाचा मंत्री असण्यासोबतच मी या मुलांचा पालक आहे. आमची मुलं-मुली स्वतःच्या हक्कांसाठी हिंमतीने उभी राहिली आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मागण्या रास्त असून त्यावर कोणताही मोठा अडथळा नाही. केवळ काही प्रशासकीय आणि तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ हवा आहे.’ परिणामी काल रात्री उशिरा झालेली बैठक अखेर निष्फळ ठरली असून मंत्र्यांनी दिलेला दोन दिवसांचा अवधी आणि विद्यार्थ्यांची लेखी आदेशाची अट यामुळे मांजरीतील वातावरण अद्यापही तापलेलेच आहे. आता शासन पुढील दोन दिवसांत कोणता ठोस निर्णय घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा