Headlines

Maharashtra Rain: राज्यात सर्वत्र पावसाची तूट; सातारा, नाशिक वगळता अनेक जिल्ह्यांत सरासरीएवढाही पाऊस नाही – maharashtra recorded 54 percent less rainfall compared to average by 26 august 2026


Maharashtra Rain: दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधून मधून हलक्या सरी असेच चित्र सगळीकडे सध्या अनुभवायला मिळते आहे. मराठवाड्यामध्ये सरासरी तापमानापेक्षा जास्त तापमानाची नोंद होते आहे.

Anderson Phillip Catch - 2026-08-27T104258
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्यासह राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात जुलैमध्ये जोरदार बरसलेल्या पावसाने जून-जुलैची सरासरी भरून काढली, मात्र ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला तरी पावसाने ओढ दिल्याने सातारा, नाशिक वगळता इतर कोणताही जिल्हा महिन्याची सरासरी गाठू शकलेला नाही. मराठवाड्यात तर सरासरीच्या पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस नोंदवला गेला आहे. ऑगस्ट महिन्यात (२६ ऑगस्टपर्यंत) यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत ५४ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात १ ते २६ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १८१ तर शहरात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत २३ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे. पावसाचा जोर वाढण्यास अपेक्षित असलेले वातावरणच गेल्या महिनाभरात तयार झाले नाही. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता, इतरत्र पाऊस पडला नाही.

Maharashtra TimesSunetra Pawar: कंपन्यांच्या वेळेत बदल करा; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनादरम्यान, पुण्यात जुलैमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला होता. पण ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासून पावसाचा जोर ओसरला आहे. दिवसभरात सरासरी तीन ते चार मिलिमीटर पावसाची नोंद होते आहे. जिल्हा आणि घाट माथ्यावरही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी सध्या बरसत आहेत. त्यामुळे एकूण जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट वाढली आहे. पुढील चार दिवसात शहरात लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही, असे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत पडलेला पाऊस

  • १ जून ते २६ ऑगस्ट : ६६५ मिमी
  • १ ते ३० जून : ६४ मिमी
  • १ ते ३१ जुलै : ५२५ मिमी
  • १ ते २६ ऑगस्ट : ७६ मिमी

Maharashtra TimesPune News : पुण्यातलं चक्रावणारं प्रकरण, जेलमध्ये भेटले अन् कट आखला, सायबर क्राईमचं जाळं विणलंसरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलेले जिल्हे (टक्क्यांमध्ये)

  • अकोला (-८५)
  • बीड (-८५)
  • वर्धा (-८४)
  • अमरावती (-८६)
  • यवतमाळ (-७९)
  • सोलापूर (-७७)
  • नागपूर (-७४)
  • अहिल्यानगर (-७४)
  • धाराशिव (-७३)
  • हिंगोली (-७१)
  • वाशीम (-६८)
  • परभणी (- ६७)
  • चंद्रपूर (-६४)
  • नांदेड (-६०)

ऑगस्ट महिन्यात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडलेले जिल्हे (टक्क्यांमध्ये)

  • सातारा (१९)

नाशिक (३)

सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेले जिल्हे – (टक्क्यांमध्ये)

  • बुलढाणा (- ५९)
  • लातूर (-५२)
  • छत्रपती संभाजीनगर (-४६)
  • पालघर (४३)
  • मुंबई (-३५)
  • ठाणे (-३२)
  • सांगली (-३२)
  • रायगड (-३०)
  • रत्नागिरी (-२५)
  • गोंदिया (-२५)
  • सिंधुदुर्ग (-२४)
  • पुणे (-२३)
किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा