काय म्हटलं आहे उषा चव्हाण यांनी त्यांच्या व्हिडिओत?
नमस्कार, मी आपली उषा चव्हाण बोलतेय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतक्या दिवस कुठे गायब होते. आता सात दिवसांनी ३ महिने होतील. मी माझा जीवनगौरव पुरस्कार दिघे साहेबांच्या आश्रमात ठेऊन आलेले. त्यावेळी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला तेव्हा खात्री दिलेली. सगळ्या गोष्टी मला विचारून घेतल्या. कायदेशीर बाबी होत्या, त्या सगळ्या मी आणि माझ्या मुलांनी त्यांना सांगितल्या. हे ऐकल्यानंतर त्यांनी मला निश्चितपणे सांगत, वचन दिलं होतं होतं की, उषाताई मी तुमचं काम करणार.
Maharashtrachi Hasyajatra फेम ओंकार राऊतची मोठ्या पडद्यावर वर्णी, कोकणातील गूढकथेवर आधारित मराठी सिनेमा; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
पण आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालतायतून एक पत्र आलंय. त्यात काहीही लिहिलंय. ज्या टीडीआरसाठी मी आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. त्याच वेळी माझ्या विरोधातल्या लोकांचे काही उपद्व्याप मंत्रालयात चालले होते. हे मला नंतर कळलं. ज्यासाठी मी इतकं कष्ट केलंय, त्रागा केलाय. तो हिस्सा मी पुणे महानगरपालिका एका परप्रांतीयाला देऊन टाकतेय. कागदपत्री सगळे हक्क असताना. आम्हा माय लेकरांना त्रास देऊन काय मिळालं त्यांना. उलट बदनामी केलीय त्यांनी पुणे महानगरपालिकेची. काय अधिकार आहे हो तुम्हाला आमचा टीडीआर द्यायचा लोकांना. कोर्टाने निर्णय दिलाय, दोन्ही पक्षांनी एकत्र बसून वाद सोडवावा. यात महापालिकेला कोणताही अधिकार नाहीये. तरीसुद्धा बळजबरी करतात. कोण आहे त्यांच्या पाठीमागे? बेकायदेशीर स्वत: वागायचं आणि आम्हाला हेलपाटे घालायला लावायचे. वयाच्या ८० व्या वर्षीही स्वत:च्या हक्कासाठी झगडावं लागत आहे. मराठी माणसाच्या कष्टाचं परप्रांतीयांना द्यायचं, असं म्हणतउषा चव्हाणयांची उद्विग्नता व्यक्त केली आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांनी सरकारवर टीका केली असून लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
तसंच दुसरी एक पोस्ट शेअर करत उषा चव्हाण यांनी प्रशासनाकडून त्यांना आलेले पत्र शेअर केले आहे.हे शेअर करताना त्यांनी लिहिलं की, आज धर्मवीर आनंद दिघे साहेब असते, तर माझा १/३ हिस्सा मला सुरक्षित शब्द देऊन दिला गेला असता. आज दबाव आणून मला त्रास देण्यात येत आहे.
Amrapali Dubey : लग्नाआधीच मुलगी दत्तक घेण्याच्या निर्णयावर वडिलांची नाराजी, समाजाचं कारण, अभिनेत्रीला आलं रडू
पण माझे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे लक्षात ठेवत आज मी ७५ प्लस आहे, तरीही माझ्या हक्कासाठी आंदोलन करेन आणि मला न्याय मिळेपर्यंत लढत राहीन.जय भवानी! जय शिवाजी! हर हर महादेव!
नेमका काय आहे वाद?
पुण्याच्या धनकवडी भागातील उषा चव्हाण यांच्या कौटुंबिक मालकीच्या जागेचा वाद गेल्या २६ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होता. उच्च न्यायालयानं उषा चव्हाण यांच्या मुलाचा (हृदयनाथ) या मालमत्तेत कायदेशीर हिस्सा असल्याचं मान्य केलं होतं. तरीही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका खाजगी विकासकाच्या (बिल्डर) फायद्यासाठी चुकीच्या पद्धतीनं टीडीआर (TDR) मंजूर केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
शासकीय यंत्रणा आणि महापालिका प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचं पाहून उषा चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.
न्यायालयीन आदेश असूनही जर आमचे हक्क सुरक्षित राहत नसतील, तर मिळालेल्या सन्मानांचं मूल्य काय?”असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारने दिलेले सर्व शासकीय पुरस्कार व मानचिन्हे ठाण्यातील दिवंगत आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी ठेवले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्तक्षेप आणि तात्पुरती स्थगिती
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ हस्तक्षेप केला होता. यानंतर धनकवडी इथल्या विवादित टीडीआर व्यवहाराला उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती. नगरविकास विभाग आणि नगररचना अधिकाऱ्यांना या प्रकरणात चौकशी करून स्वतंत्र सुनावणी घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते.
उषा चव्हाण यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्यावर अथवा त्यांच्या कुटुंबावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं..

