Headlines

Satara DCC Bank : ज्या बँकेनं महाराष्ट्राचा सहकार सांभाळला, त्या बँकेच्या निवडणुकीत इतका राडा का? – satara dcc bank history and vilas kaka undalkar work model


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवेळी उठलेला राजकीय धुरळा नुकताच खाली बसतोय ना बसतोय, तोच साताऱ्याच्या राजकारणात आणखी एका मोठ्या संग्रामाची ठिणगी पडलीय!नाबार्डचे सलग सातपेक्षा जास्त राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी आणि महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात अत्यंत अग्रगण्य मानली जाणारी ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’. सध्या या बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. पण यंदाची ही निवडणूक फक्त एका सहकारी बँकेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर या निवडणुकीने साताऱ्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अत्यंत तीव्र संघर्षाचे रूप धारण केलंय. विकास सोसायट्यांच्या ठरावांवरून थेट हाणामारी, पोलिसांचा आणि ‘एसआरपीएफ’चा बंदोबस्त आणि एका एका ठरावासाठी लाखोंचा चुराडा! जावळी तालुक्यातील ‘आखाडे’ गावात घडलेला प्रकार असो किंवा नेत्यांचे एकमेकांवर होणारे आरोप-प्रत्यारोप असो… सध्या साताऱ्याचे राजकारण याच निवडणुकीभोवती फिरताना दिसतंय. पण प्रश्न असा पडतो की, ज्या बँकेने महाराष्ट्रातील सहकाराचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला, ज्या बँकेला लोकनेते विलासकाका उंडाळकरांसारख्या दिग्गजांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या बँकेच्या निवडणुकीत आज हा राडा का होतोय? सातारा DCC बँकेचा सुवर्ण इतिहास, विलासकाका उंडाळकर यांचं बँकेसाठी असलेलं अतुलनीय योगदान, बँकेत निर्माण झालेली शिस्त आणि कार्यसंस्कृती आणि… सध्याच्या निवडणुकीत नेमकं काय शिजतंय? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत