Headlines

Famous Chef Vishnu Manohar Reaction on Tukaram Mundhe Statement About Savaji


तुकाराम मुंढे यांनी अमरावतीत कार्यक्रमात सावजीबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावजी म्हणजे फक्त तिखट नाही तर समृद्ध परंपरा आहे, असं विष्णू मनोहर म्हणाले आहेत.

Tukaram Mundhe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : अमरावती येथील एका कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरच्या सावजी खाद्यपदार्थांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर विदर्भातील प्रसिद्ध सावजी खाद्यसंस्कृती पुन्हा चर्चेत आली आहे. “नागपूरचं सावजी खाल्लं तर माझं पोट खराब होईल. मी एक महिना हॉस्पिटलमध्ये जाईन,” असे वक्तव्य करत त्यांनी अति तिखट आणि तेलकट अन्नामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. त्यांच्या या विधानावर आता प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्रतिक्रिया देत पारंपरिक सावजी खाद्यसंस्कृतीची बाजू मांडली आहे.

विष्णू मनोहर यांनी सांगितले की, सावजी ही केवळ तिखट मटणाची डिश नसून विणकर (हलबा) समाजाची अनेक वर्षांची समृद्ध खाद्यपरंपरा आहे. पारंपरिक सावजी बनवण्याची पद्धत आजच्या अनेक हॉटेलांमध्ये मिळणाऱ्या सावजीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. खऱ्या सावजीमध्ये मसाले प्रथम व्यवस्थित भाजले जातात. त्यानंतर पाटा-वरवंट्यावर वाटले जातात. या प्रक्रियेमुळे मसाल्याचा स्वाद टिकून राहतो आणि रस्सा संतुलित, पातळ आणि पचायला तुलनेने हलका तयार होतो. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बनवलेले सावजी पोटासाठी त्रासदायक नसते.

मात्र, आजकाल अनेक ठिकाणी जास्त प्रमाणात तिखट, तेल आणि मसाल्यांचा वापर करून त्यालाच सावजी म्हणून विकले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे लोकांमध्ये सावजी म्हणजे अत्यंत तिखट आणि आरोग्यास अपायकारक अशी चुकीची प्रतिमा तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “सावजी म्हणजे फक्त तिखट नाही, तर एक समृद्ध खाद्यपरंपरा आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या सावजीचा आस्वाद घेतला तर त्याच्या प्रेमात पडाल,” असे आवाहनही विष्णू मनोहर यांनी केले.

तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी कार्यक्रमात अन्नातील भेसळीचाही मुद्दा उपस्थित केला. “बाजरीपासून तेलापर्यंत अनेक ठिकाणी भेसळ आढळते. आपण हॉटेलमध्ये गेल्यावर ‘स्पायसी जेवण द्या’ अशी मागणी करतो. नागपूरला गेल्यावर सावजी मागवतो. माझ्यासारख्या व्यक्तीने ते खाल्ले तर मी एक महिना हॉस्पिटलमध्ये जाईन. अशा प्रकारचे अन्न खाल्ल्यानंतर हार्ट अटॅक येणार नाही तर दुसरे काय होणार?” असे ते म्हणाले.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाकडून राज्यभरात धडक कारवाई केली जात आहे. अन्न चांगले राहिले तर नागरिकांचे आरोग्य चांगलं राहू शकतं. त्यामुळे राज्यातील विविध हॉटेल, ढाबे आणि उपहारगृहांमध्ये अन्न सुरक्षांच्या नियमांचे पालन केले जावे, अशी तुकाराम मुंढे यांची भूमिका आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या आस्थापनांवर थेट परवाना निलंबनाचीदेखील कारवाई केली जात आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा