Mumbai monorails comeback plan integration with metro and local for revamped passenger services; मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर! मोनोरेल पुन्हा सुरू होणार, मेट्रोसह लोकलचीही जोड मिळणार
Mumbai monorails comeback plan integration with metro and local for revamped passenger services; मुंबईतील प्रवाशांसाठी खुशखबर! मोनोरेल पुन्हा सुरू होणार, मेट्रोसह लोकलचीही जोड मिळणार
महेश चेमटे, मुंबई : तब्बल दहा महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल पुन्हा धावण्याच्या तयारीत आहे. मात्र, यावेळी केवळ मोनोरेल सुरू करण्याऐवजी तिला मेट्रो आणि उपनगरी रेल्वेची प्रभावी जोड देऊन प्रवाशांसाठी अधिक उपयुक्त करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. चेंबूर येथे मेट्रो-२बी आणि मध्य रेल्वे स्थानकाशी जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण मोनोरेल मार्ग एकाचवेळी प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो-मोनोची युती होणार असल्याचे एकंदरित दिसून येत आहे.
२० सप्टेंबर २०२५पासून मोनोरेल सेवा बंद आहे. बंद होण्यापूर्वी दररोज सुमारे १८ हजार प्रवासी या सेवेचा वापर करत होते. मात्र कमी प्रवासीसंख्या आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे ही सेवा अडचणीत आली होती. त्यामुळे यावेळी मोनोरेलला शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी प्रभावीपणे जोडून तिची उपयुक्तता वाढविण्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) भर आहे.
मोनोरेल सुरू करण्याची घाई करण्याऐवजी आधी प्रवाशांना मोनोपर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी आवश्यक जोडणी करणे आवश्यक आहे. मोनोरेल टप्प्याटप्प्याने सुरू करण्याऐवजी संपूर्ण मार्गावर एकाच वेळी सेवा सुरू करण्यात येणार आहे. मोनोरेलचा पूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यावरच प्रवाशांना त्याचा खऱ्या अर्थाने फायदा मिळेल आणि अधिकाधिक प्रवासी या सेवेकडे वळतील, असा प्राधिकरणाचा अंदाज आहे. चेंबूर येथे मेट्रो-२बी, मध्य रेल्वे आणि मोनोरेल यांना जोडणारा कनेक्टर उभारला जात असून, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या वाहतूक व्यवस्थेत सहज बदल करता येणार आहे. याचा फायदा मेट्रो, लोकल आणि मोनोरेल अशा तिन्ही सेवांच्या प्रवाशांना होईल, असे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मेट्रो-२बीचा डायमंड गार्डन-मानखुर्द टप्पा सुरू झाला असून, डायमंड गार्डन ते चेंबूर हा भागही पूर्णपणे तयार आहे. येत्या काही दिवसांत मेट्रो चेंबूरपर्यंत धावू लागणार असल्याने मोनोरेलच्या पुनारंभालाही गती मिळणार आहे.
मोनोरेलच्या संचालनासाठी आवश्यक असलेली सीएमआरएस अर्थात कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांच्याकडून अंतिम सुरक्षा मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे मोनोरेल पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व अनिवार्य मंजुऱ्या आता मिळाल्या आहेत. मोनोरेल पुन्हा प्रवासी सेवेत आणण्यापूर्वी तांत्रिक यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था आणि गाड्यांच्या कार्यक्षमतेची तपासणी केली जात आहे.
मेट्रोशी जोडणी, संपूर्ण मार्गावर एकाचवेळी सेवा आणि १८ गाड्यांचा ताफा या त्रिसूत्रीच्या जोरावर मोनोरेलला नवसंजीवनी देण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. यशस्वी अंमलबजावणी झाल्यास मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोनोरेलचे स्थान पुन्हा बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा