Headlines

Ajinkya Deo : ‘रामायण’मध्ये अरुण गोविल नाही तर ‘हा’ मराठी अभिनेता साकारणार होता राजा दशरथाची भूमिका, स्वतःच केला खुलासा


Ramayana Movie : ‘रामायण’ सिनेमात अरुण गोविल यांनी राजा दशरथाची भूमिका साकारली आहे. पण, यापूर्वी मराठी अभिनेत्यानं या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली.

Ajinkya Deo On Ramayana Movie
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – नितेश तिवारी यांच्या ‘ रामायण ‘ चित्रपटाची चर्चा असून हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. ३० जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रामाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते अरुण गोविल यांनी राजा दशरथाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या दशरथाच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? या भूमिकेसाठी मराठी अभिनेत्यानं ऑडिशन दिलेली. याबद्दल अभिनेत्यानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

भूमिकेबद्दल काय म्हणाले अजिंक्य देव?

मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनी राजा दशरथाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली. याबद्दल बोलताना मिड डे सोबतच्या संभाषणात ते म्हणाले, ‘मी दशरथाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण जेव्हा मी ऑडिशन दिली, तेव्हा तीन वर्षे झाली होती. पण जसजसे दिवस पुढे जात गेले, तसतशी ही भूमिका अरुणजींना मिळाली, हे खूप चांगलंच आहे. ते दशरथाच्या भूमिकेसाठी अगदी योग्य आहेत. मग त्यांनी मला विश्वामित्राची भूमिका दिली आणि मी ती लगेच स्वीकारली. कारण मला रामायणातील त्या भूमिकेचं महत्त्व माहित होतं.’

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

अजिंक्य देव पुढे म्हणाले, ‘त्यानंतर काही लुक टेस्ट झाल्या आणि सर्व काही खूप छान झालं. मला त्या लूकमध्ये पाहून ते खूप खूश झाले. ही भूमिका मिळणं ही एक खूप छान भावना आहे. ही भूमिका माझ्याकडे आपोआप चालून आली, म्हणून मी म्हणालो की, मी दुसऱ्या कशासाठी तरी ऑडिशन देत होतो आणि आता ही भूमिका करत आहे. मला वाटतं की हे माझ्यासाठी योग्य होतं. माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे हे माझ्यासाठी चांगलं ठरलं.’
Maharashtra TimesKushal Badrike : ‘रितेश सरांमुळे ‘चला हवा येऊ द्या’चा जन्म झाला’, कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा
दरम्यान, ‘रामायण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं असून नमित मल्होत्रा यांनी निर्मिती केली आहे. सिनेमात रणबीर कपूरनं प्रभू रामाची मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत आहे. रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल प्रीत सिंग शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारणार आहे.