Headlines

प्रेयसीच्या होकारासाठी प्रियकर चढला थेट मोबाईल टॉवरवर! तरुणाचा शोले स्टाईल ड्रामा


सांगली जिल्ह्यातील कुपवाडच्या स्वामी मळ्यात एका तरुणाने ‘शोले’ स्टाईल ड्रामा केला. प्रेयसीने होकार द्यावा यासाठी तरुण थेट मोबाईल टॉवरवर चढला. त्याला खाली उतरवण्यासाठी स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी प्रचंड प्रयत्न केले.

Sangli News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगली : सांगलीच्या कुपवाडमध्ये आज एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असं नाट्य बघायला मिळालं. एक तरुण आपल्या प्रेयसीने आपल्याला होकार द्यावा यासाठी थेट टॉवरवर चढला. सुरुवातीला तो टॉवरवर चढला तेव्हा तो नेमकं का चढला? ते समजले नाही. पण नंतर त्याच्यासोबत स्थानिक नागरिकांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. आपल्याला प्रेयसीने होकार द्यावा यासाठी आपण टॉवर चढल्याचं त्याने सांगितलं. यावेळी स्थानिकांनी त्याला खाली उतरवण्यासाठी विनंती केली. पण तो नागरिकांचं ऐकून घेण्यास तयार नव्हता.

प्रेयसीने होकार द्यावा, यासाठी या तरुणाने चक्क मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले’ स्टाईल ड्रामा केला. संबंधित घटना ही कुपवाडमधील स्वामी मळा परिसरात घडली. ‘ती आली तरच खाली उतरेन’, असा हट्ट या तरुणाने धरला होता. त्यामुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. अजय जाधव असं या तरुणाचं नाव आहे.

पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

तरुण मोबाईल टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच कुपवाड पोलीसआणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टॉवरवर असलेल्या तरुणाशी संवाद साधत त्याची समजूत काढण्यास सुरुवात केली. पण तरुण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

प्रेयसीने यावं, तरुणाची अट

प्रेयसीने घटनास्थळी येऊन आपल्याशी संवाद साधावा, अशी मागणी करत तरुण खाली उतरण्यास तयार होत नव्हता. या प्रकाराची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली.

अखेर तरुणाची समजूत काढण्यात पोलिसांना यश

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. या प्रकारामुळे उपस्थितांना ‘शोले’ चित्रपटातील धर्मेंद्रच्या पाण्याच्या टाकीवरील प्रसंगाची आठवण झाली. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि सायंकाळी तरुणाची समजूत काढून त्याला सुखरूपपणे टॉवरवरून खाली उतरवण्यात आले.

तरुणाला रुग्णवाहिकेतून नेलं

तरुण टॉवरखाली उतरल्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून घटनास्थळावरुन नेण्यात आलं. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या तरुणाला कुणाकडूनही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलिसांकडून सर्वोतोपरी खबरदारी घेतली गेली. पोलिसांकडून तरुणाची आता समजूत काढण्यात आली आहे.

अशाप्रकारचं कृत्य कुणीही करु नये

दरम्यान, तरुणांनी अशाप्रकारची स्टंटबाजी करु नये. अन्यथा ते जीवघेणी ठरु शकतं, असं आवाहन नेहमी पोलिसांकडून केलं जातं. याआधीदेखील शोले स्टाईल आंदोलन काही जणांकडून करण्यात आलं आहे. या अशा आंदोलनात जीवाला धोका असतो. अशाप्रकारे उंच टॉवरवर चढल्यानंतर तोल जावून थेट खाली पडण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा गोष्टी करणं योग्य नाही.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा