Ramayana Movie : ‘रामायण’ सिनेमात अरुण गोविल यांनी राजा दशरथाची भूमिका साकारली आहे. पण, यापूर्वी मराठी अभिनेत्यानं या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – नितेश तिवारी यांच्या ‘ रामायण ‘ चित्रपटाची चर्चा असून हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. ३० जुलै रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रामाच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते अरुण गोविल यांनी राजा दशरथाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या दशरथाच्या भूमिकेचं खूप कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? या भूमिकेसाठी मराठी अभिनेत्यानं ऑडिशन दिलेली. याबद्दल अभिनेत्यानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
भूमिकेबद्दल काय म्हणाले अजिंक्य देव?
मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनी राजा दशरथाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेली. याबद्दल बोलताना मिड डे सोबतच्या संभाषणात ते म्हणाले, ‘मी दशरथाच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण जेव्हा मी ऑडिशन दिली, तेव्हा तीन वर्षे झाली होती. पण जसजसे दिवस पुढे जात गेले, तसतशी ही भूमिका अरुणजींना मिळाली, हे खूप चांगलंच आहे. ते दशरथाच्या भूमिकेसाठी अगदी योग्य आहेत. मग त्यांनी मला विश्वामित्राची भूमिका दिली आणि मी ती लगेच स्वीकारली. कारण मला रामायणातील त्या भूमिकेचं महत्त्व माहित होतं.’
अजिंक्य देव पुढे म्हणाले, ‘त्यानंतर काही लुक टेस्ट झाल्या आणि सर्व काही खूप छान झालं. मला त्या लूकमध्ये पाहून ते खूप खूश झाले. ही भूमिका मिळणं ही एक खूप छान भावना आहे. ही भूमिका माझ्याकडे आपोआप चालून आली, म्हणून मी म्हणालो की, मी दुसऱ्या कशासाठी तरी ऑडिशन देत होतो आणि आता ही भूमिका करत आहे. मला वाटतं की हे माझ्यासाठी योग्य होतं. माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे हे माझ्यासाठी चांगलं ठरलं.’ Kushal Badrike : ‘रितेश सरांमुळे ‘चला हवा येऊ द्या’चा जन्म झाला’, कुशल बद्रिकेनं सांगितला किस्सा दरम्यान, ‘रामायण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं असून नमित मल्होत्रा यांनी निर्मिती केली आहे. सिनेमात रणबीर कपूरनं प्रभू रामाची मुख्य भूमिका साकारली आहे. अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत आहे. रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल प्रीत सिंग शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेत्री लारा दत्ता कैकेयीची भूमिका साकारणार आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा