हिंगोली जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचा धक्का:3.1 रिश्टर स्केलची नोंद, म्हैसगव्हाण केंद्र बिंदू; 6 वर्षात 36 वेळा भूकंपाची नोंद
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरुच असून शनिवारी ता. २५ रात्री सहा वाजून ४९ मिनीटांनी जिल्हा भूकंपाने हादरला आहे. कळमनुरी तालुक्यातील म्हैसगव्हाण हे भूकंपाचे केंद्र बिंदू असून भूकंपाची ३.१ रिश्टर स्केल नोंद झाली आहे. वारंवार होणाऱ्या भूकंपाने जिल्ह्यातील नागरिक आता पुरते घाबरले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून जमीनीतून आवाज येण्याची मालिका सुरु होती. अचानक जमीनीतून…
