Nashik Earthquake | नाशिकच्या सुरगाण्यात भूकंपाचे 4 सौम्य धक्के
त.भा. प्रतिनिधीनाशिक जिह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यात आज सकाळी एकापाठोपाठ चार धक्के बसले, तर पालघर जिह्यातही भूकंपाचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि आसपासच्या परिसरात शनिवारी…
