Headlines

Hina Khan : ‘आपल्या समाजात एकापाठोपाठ एक लग्न करणं चांगलं मानलं जात नाही’, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर हिना खानचं वक्तव्य


Hina Khan On Aamir Khan Third Marriage : हिना खाननं एका शोमध्ये आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

Hina Khan On Aamir Khan Third Marriage
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – हिना खान आणि रुबिना दिलैक यांनी नुकताच त्यांचा नवीन यूट्यूब शो, ‘द पॉइंट ऑफ व्ह्यू’ सुरू केला आहे असून या शोमध्ये चालू घडामोडी आणि वादग्रस्त विषयांवर चर्चा करतात आणि आपली मतं मांडतात. अलीकडेच, हिना आणि रुबिना यांनी त्यांच्या पतीसोबत शिल्पा शिंदे आणि गौरव खन्ना यांच्या घटस्फोटावर चर्चा केली आणि आता त्यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरही भाष्य केलं आहे. हिनाने असंही म्हटलं आहे की, आपल्या समाजात तिसरं सलग्न अशुभ मानलं जातं.

अलीकडील एका एपिसोडमध्ये, हिना आणि तिचा पती रॉकी जैस्वाल यांनी एका सुपरस्टारच्या वैयक्तिक आयुष्याचा त्याच्या व्यावसायिक यशावर परिणाम होतो की नाही यावर चर्चा केली. शो दरम्यान, रॉकी जैस्वालनं आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर झालेल्या टीकेचा मुद्दा उपस्थित केला आणि या विषयावर त्यांचं मत विचारलं.
Maharashtra TimesPrashant Damle : आजकाल बाल्कनीचा प्रेक्षकवर्ग नाही, 500 रुपयांच्यावर आम्हाला जाता येत नाही; नाटकाच्या तिकीट दराबद्दल स्पष्टच बोलले प्रशांत दामले
एका सुपरस्टारच्या वैयक्तिक आयुष्याचा त्याच्या चित्रपटांवर आणि कारकिर्दीवर परिणाम होतो, असं रुबिना दिलैकचं मत होतं, तर हिना खान म्हणाली, ‘असं असेल तर, आमिर खानचा एकही चित्रपट यशस्वी व्हायला नको.’ रुबिना म्हणाली की, आमिरचं आयुष्य कधीही मोठ्या वादांनी घेरलेलं नाही, तेव्हा हिना खाननं रुबिनाच्या बोलण्याला विरोध केला आणि आमिरच्या गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नाचा उल्लेख करत म्हणाली की, ‘हे काही कमी वादग्रस्त आहे का?’

आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर टीका; राणेंनंतर गोपीचंद पडळकरही भडकले

हिना खानचं वक्तव्य चर्चेत

त्यानंतर हिना खान पुढे म्हणाली, ‘सर्वसामान्य माणूस विचार करेल, ‘अरे! हा पुन्हा लग्न करतोय? दुसऱ्या बायकोला पण सोडलं?’ हे ऐकून रुबिनानं हिनाला मध्येच थांबवत म्हटलं की, ‘आपण जज का करत आहोत? आमिरने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, तरीही लोक त्याच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या लग्नावर जास्त लक्ष केंद्रित करतात.’ यावर हिना म्हणाली की, ‘मी आमिरला जज करत नाहीये. पण, रुबिना आपल्या समाजात एकापाठोपाठ एक लग्न करणं चांगलं मानलं जात नाही.’ यावर रॉकी जैस्वालनं उत्तर दिलं, ‘लग्न तर सोडाच, घटस्फोटसुद्धा चांगला मानला जात नाही.’
Maharashtra TimesDharmendra Pradhan Resignation : आता मागे हटायचं नाही! धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मराठी कलाकार खुश, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
दरम्यान, ६१ वर्षीय आमिर खाननं ५ जुलै २०२६ रोजी त्याच्या घरी गौरी स्प्रॅटसोबत लग्न केलं. हे अभिनेत्याचं तिसरं लग्न आहे. या लग्नामुळे आमिरवर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र, यावर अभिनेत्यानं स्पष्ट केलं की, गौरी हिंदू किंवा मुस्लिम नसून ख्रिश्चन आहे, आणि ती कोणत्याही धार्मिक श्रद्धांचं पालन करत नाही. त्याचं संपूर्ण कुटुंब सर्व धर्मांचं पालन करतं.