मंत्रिमंडळात होणार फेरबदल?
त. भा. प्रतिनिधी बेंगळूर : मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ आमदारांचे समाधान करण्यासाठी काँग्रेस पक्ष मंत्रिमंडळाची पुनर्रचना किंवा तिसऱ्यांदा विस्तार करण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर हायकमांडशी सल्लामसलत करून लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सरसावले आहेत. मंत्रिमंडळ किरकोळ बदल करण्यासंदर्भात काँग्रेस हायकमांडशी पुन्हा चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार रविवारी नवी दिल्लीला रवाना होतील….
