इराणने अमेरिकेला दिले युद्धातील नुकसानीचे पुरावे
लढाऊ विमानांच्या अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध वृत्तसंस्था तेहरान इराणच्या सरकारी माध्यमांनी अमेरिका-इराण युद्धात नष्ट झालेल्या विमानांच्या अवशेषांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये अमेरिकी हवाई दलाच्या एफ-15ई स्ट्राइक ईगल विमानाचा समावेश आहे. या छायाचित्रांमध्ये विमानाचा मुख्य भाग (फ्युजलेज) आणि एसीईएस-2 इजेक्शन सीट स्पष्टपणे दिसत आहे. छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या खुणांच्या आधारे, या एफ-15ई विमानाचा क्रमांक 00-3000 असल्याचे ओळखण्यात आले…
