जालन्याची रेशीम कोष बाजारपेठ असेल टॅक्स फ्री:24 तासांत पैसे खात्यावर, वैज्ञानिक ग्रेडिंग, ड्रायिंग अन् डिजिटल लिलावाची सुविधा
रेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता कर्नाटकच्या रामनगर बाजारपेठेपर्यंत जावे लागणार नाही. त्यासाठी जालन्यातच रेशीम कोष बाजारपेठ विकसित करण्यात आली आहे. कर्नाटकच्या बाजारपेठेत 1 टक्के शुल्क आकारले जाते. ते येथे माफ राहणार आहे. शिवाय कोषाचे वैज्ञानिक ग्रेडिंग उपलब्ध असेल.ड्रायिंगची अत्याधुनिक सुविधा असेल. लिलाव आणि व्यवहार डिजिटल होतील. येथे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी निवासाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात…
