सध्या डॉ. शबनम सिन्हा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या इंडिपेंडेंट डिरेक्टर आहेत. तसेच त्या स्पेशल कमिटी ऑन मॉनिटरिंग फ्रॉड्सच्या चेअरपर्सन आहेत. एअरटेल पेमेंट्स बँकेच्या रिस्क मॅनेजमेंट समितिच्या त्या सदस्या आहेत. त्यांना ऑडिट, रिस्क, तंत्रज्ञान, ईएसजी, स्टेकहोल्डर गवरनन्स तसेच फ्रॉड मॉनिटरिंग या क्षेत्रांत बोर्ड लेवल अनुभव आहे. त्याचसह त्या इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजी समितिच्याही सदस्या आहेत. त्यांनी ह्युमन कॅपिटल तसेच नॉमिनेशन क्षेत्रांतही बोर्ड अनुभव घेतला आहे. आता डॉ. सिन्हा एअरटेल पेमेंट्स बँकेच्या चेअरमन पदासाठी नियुक्त होणार असून त्यासाठी आरबीआईची मंजूरी आवश्यक आहे.
डॉ. शबनम सिन्हा यांना फार मोठा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. त्यांनी युरोप तसेच मध्य आशियातही कामे केली आहेत. त्याचबरोबर आफ्रिकेतही कामे केली आहेत. त्यांना कामाचा दांडगा अनुभव असून 2010 ते 2025 या काळात त्या लीड स्पेशालिस्ट होत्या. त्यांना बँकिंग, पब्लिक पॉलिसी, रिस्क मॅनेजमेंट तसेच डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रात अनुभव आहे.
या अगोदर डॉ. शबनम सिन्हा यांनी 2007 ते 2010 दरम्यान IL&FS Education & Technology Services कंपनीच्या सीईओ पदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी कंपनीचा नफा-तोटा, आर्थिक व्यवस्थापन तसेच खाजगी भागीदाऱ्या, सरकारी भागीदाऱ्यांच्या व्यवस्थापनांची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी यूएसएआयडी मध्ये सीनियर प्रोग्रामच्या मुख्य सल्लागार पदी काम केले आहे. भारत सरकार तसेच एनसीईआरटीसाठी 10 वर्षे काम केले आहे.
8th Pay Commission Pension Hike: तीन ते चार पट पेन्शन वाढीचा प्रस्ताव: ज्यांना 50 हजार अपेक्षित, त्यांना 1.91 लाख मिळू शकतो; पगारनिहाय पाहा पेन्शनचं गणितकोण आहेत सुनील भारती मित्तल?
सुनील भारती मित्तल यांनी एअरटेल पेमेंट्स बँकेच्या Non-Executive चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. ते भारती एन्टरप्राइजेज कंपनीचे चेअरमन आहेत. 1976 साली त्यांनी भारती एन्टरप्राइजेजची स्थापना केली होती. टेलीकॉम क्षेत्रातील त्यांच्या योगदानांमुळे त्यांना जीएसएमए लाईफटाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

