Fake Milk Racket Busted: भेसळखोरांना अद्दल घडवा – how chemical milk racket was exposed in maharashtra
धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात सुरू केलेल्या कारवायांच्या धडाक्यामुळे दुधापासून पनीरपर्यंत आणि ‘एनर्जी ड्रिंक’पासून सौंदर्य प्रसाधनांपर्यंत अनेक जिन्नसांमधील भेसळीचे प्रकार उघडकीस येत आहेत. एखाद्या अधिकाऱ्याने पुढाकार घेतल्यावर महिन्या-दोन महिन्यांतच इतक्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून येत असतील, तर भेसळ करणाऱ्या माफियांच्या अधोविश्वाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याची कल्पना…
